मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाल्यानंतर मुंबईसाठीही एक दिलासादायक बातमी आहे. कोरोना प्रादुर्भावामुळं मुंबईत आतापर्यंत पाचव्यांदा आणि डिसेंबर महिन्यात चौथ्यांदा दिवसभरात एकाही कोरोना मृत्यूची नोंद झाली नाही. या आधी 7 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईत पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात आतापर्यंत चौथ्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबई महापालिका प्रशासनानं परिस्थितीनुसार, वेळोवेळी राबवलेल्या उपाययोजना आणि लसीकरणाचा हा सकारात्मक परिणाम असल्याचं बोललं जातं आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 204 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
डिसेंबर महिन्यात याआधी 11, 15 आणि18 डिसेंबरला शून्य मृत्यूची नोंद झाली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावात मुंबईला हा मोठा दिलासा मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 204 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 224 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,46,328 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.
मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही
मुंबईत गेल्या 24 तासात एकाही रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. सध्या मुंबईत 2059 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 2095 दिवसांवर गेला आहे. सील केलेल्या इमारतींची संख्या देखील कमी झाली आहे. मुंबईतील सध्या 17 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या :