मुंबई : कोस्टल रोडचा (Coastal Road) दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मरीन ड्राइव्ह (Marine Drive) ते हाजी अली (Haji Ali) दरम्यानचा हा बोगदा आजपासून सुरू होतोय. हाजी अली ते वरळी हा टप्पा सुरू होण्यासाठी आणखी एक महिना लागणार आहे. मुख्यमंत्री आणि दोेन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यावर हा मार्ग खुला होणार आहे. या बोगद्यामुळे मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा अत्यंत गजबजलेला मार्ग अवघ्या काही मिनिटांत पार करता येणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती.
उद्घाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज पुन्हा एकदा वाहतुकीला दिलासा मिळेल, वरळीकडे जाणार मार्ग आज खुला झाला. 6.5 किमीचे अंतर आहे पुढील रस्ता 10 जुलै रोजी सुरू करत आहोत. पहिला टप्पा सुरू केला. दुसरा टप्पा सुरू करत आहोत तिसरा टप्पा 10 जुलै रोजी होईल. आधी 40 ते 50 मिनिटं लागत होती आता 9 मिनिटात हा टप्पा पार करता येणार आहे. अत्यावशक सर्व यंत्रणा या भूमिगत रस्त्यात आहेत. लवकरच हा रस्ता वरळी सी लिंकला जोडला जाईल.
मंत्रिमंडळ विस्तारावर एकनाथ शिंदे म्हणाले...
महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होणार असल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या 27 जूनपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्या अधिवेशनापूर्वीच विस्तार होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याविषयी एकनाथ शिंदेंना विचारले असता ते म्हणाले, रस्त्यांच्या विस्ताराप्रमाणे मंत्रीमंडळाचा विस्तारही लवकरच होईल.
राज ठाकरेंच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले...
दिल्लीतील एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी (NDA Government Oath Ceremony) राज ठाकरेंना आमंत्रण मिळाले नाही या प्रश्नाचे उत्तर एकनाथ शिंदेंनी टाळले.
मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प कुठून कुठपर्यंत?
- मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असेल.
- दक्षिण कोस्टल रोड हा 10.58 किमी लांबीचा आहे.
- प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी हा प्रकल्पातील पहिला टप्पा सुरू होणार आहे.
- एकूण प्रकल्पाचा खर्च 12,721 कोटी रुपये आहे
- यामध्ये 15.66 किमी चे तीन इंटरचेंज आणि 2.07 किमी चे एकूण दोन बोगद्यांचा समावेश असेल
- कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये 70 टक्के वेळेची बचत होणार असून ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण त्यामुळे कमी होईल.
Video :