Mumbai Bhandup Fire LIVE | आगीतील मृतांची संख्या 11 वर पोहोचली

Mumbai Bhandup COVID-19 Hospital Fire LIVE Updates | भांडुपमध्ये रात्री 12 च्या सुमाराला ड्रीम मॉलमध्ये भीषण आग लागली आहे. या मॉलमध्ये कोव्हिड रुग्णालय आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Mar 2021 09:52 AM
अशोक वाघमारे यांचं शव आताच बाहेर काढलं आहे

अशोक वाघमारे हे काल ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यामुळे कोविड रुग्णलयात दाखल झाले होते. आग रात्री लागल्यापासून ते मिळत नसल्याने शोध घेतला जात होता अखेर त्यांचा शव कुलिंग ओप्रेशनझ सुरू असताना चौथ्या मजल्यावर मिळाला आहे. दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू. 

ड्रीम मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला ओसी नव्हती

ड्रीम मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला ओसी नव्हती अशी माहिती हाती आली आहे. 6 मे 2020 रोजी सनराईज हॉस्पिटलला कोविड रुग्णांच्या उपचारासाठी कोविड हॉस्पिटल म्हणून तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. 31 मार्च 2021 पर्यंत तात्पुरत्या परवानगीचा कालावधी संपणार होता. सनराईज हॉस्पिटल प्रशासनाची आग प्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं आहे. कुणाचा निष्काळजीपणा भोवला याचीही चौकशी होणार आहे. मार्च महिन्यात या हॉस्पिटलमधील अनियमितता आणि इतर त्रुटींकरता कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. या रुग्णालयात 78  पेशंट होते. त्यांपैकी 6 पेशंटचा मृत्यू झाला आहे तर 72 रुग्णांना आपण इतरत्र हलवलंय, अशी माहितीही आयुक्तांनी दिली आहे.   

मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर

भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणीही केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली त्याचप्रमाणे अशा रीतीने राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड  रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरु आहेत त्या ठिकाणच्या अग्नीसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगून ते म्हणाले की, यासंदर्भात ज्यांनी दुर्लक्ष व दिरंगाई केली अशा सर्व जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. 

आगीतील मृतकांची संख्या 6 वर पोहोचली

भांडुपच्या ड्रीम्स मॉलमधील सनराइज हॉस्पिटलला लागलेल्या आगीतील मृतकांची संख्या 6 वर पोहोचली

हा मॉल शापित असल्याची चर्चा 


हा मॉल शापित प्रॉपर्टी आहे, तो कधीच सुरू झाला नाही अशी लोकांत चर्चा आहे. एचडीआयएलने तो बांधला. हा मॉल आशियातील सर्वात मोठा मॉल होता पण केसेस सुरू झाल्या आणि तो सुरूच झाला नाही. गेली 10 ते 15 वर्ष मॉल असाच रिकामा आहे. त्यात फक्त मल्टिप्लेक्स सुरू आहे. त्यात हे हॉस्पिटल कसे सुरू झाले हा पण प्रश्न आहे. सगळ्यात जास्त अनधिकृत धंदे करणारी कार्यलयं ही याच मॉलमध्ये आहेत असंही सांगितलं जातंय.

भांडुप ड्रीम मॉलमध्ये फायर यंत्रणा ठिक नसल्याने या आधी बीएमसीची नोटीस

मुंबईमध्ये काही दिवसापूर्वी बीएमसीने एक सर्व्हे केला होता. त्यामध्ये 29 मॉलमध्ये फायर यंत्रणा ठिक नसल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या यादीत 29 व्या क्रमांकावर भांडुपच्या ड्रीम मॉलचे नाव आहे. या सर्व मॉलना बीएमसीने नोटीस पाठवली होती. 

आगीमुळे वाहतुकीचा मार्ग बदलला

भांडुप पश्चिम, ड्रीम मॉल येथे मोठी आग लागल्याने भांडुप सोनापूर ते गांधी नगर जंक्शन (कंजूरमार्ग) पर्यंत लाल बहाद्दूर शास्त्री मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.
सर्व गाड्या पूर्व द्रुतगती मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.

दोन रुग्णांचा मृत्यू आगीमुळे नाही, सनराईज रुग्णालयचे निवेदन

सनराईज रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, जे दोन रुग्ण दगावले ते आगीमुळे दगावले नाही. त्यांचा मृत्यू आगीमुळे झालेला नाही, आधीच कोव्हिड उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या औपचारिकतेचे काम बाकी असल्याने शव रुग्णालयात होते. आग लागली तेंव्हा आलर्म वाजल्यानंतर ताबडतोब सर्व लाइट्स कनेक्शन बंद केले आणि रुग्णांना बाहेर काढले. 76 च्या आसपास रुग्ण आतमध्ये होते, त्यात दोन जणांचा आधीच मृत्यू झला होता. आता त्यांना जवळच्या मुलुंड जम्बो कोव्हिड सेंटर आणि फॉरटीस रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

मॉलमध्ये रुग्णालय कसे? चौकशी करणार: महापौर

या ठिकाणी मॉलमध्ये रुग्णालय कसे केले गेले या बद्दल महापौरांनी आश्चर्य व्यक्त केले असून या बाबत चौकशी होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  या आगीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले. बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बचाव कार्य संपल्यानंतर ही आग कशी लागली याची चौकशी करण्यात येणार असल्याचं महापौरांनी आणि उपायुक्तांनी स्पष्ट केलं.

भांडुप येथे मॉलला भीषण आग, वरच्या मजल्यावरील कोव्हिड रुग्णालयातील दोघांचा मृत्यू

भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली आहे. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय आहे. काल रात्री लागलेल्या या आगीत कोव्हिड रुग्णालयातील दोन जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या आगीत मृताच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पार्श्वभूमी

मुंबई : भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली आहे. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय आहे. काल रात्री लागलेल्या या आगीत कोव्हिड रुग्णालयातील दोन जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या आगीत मृताच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


आगीच्या या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश ककाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्य गेल्या सहा तासांपासून सुरु आहे. 


ही आग प्रथमतः पहिल्या मजल्यावर लागली आणि ती वाढत जाऊन वरच्या रुग्णालयापर्यंत पोहचली.  रुग्णालयात आग लागली तेव्हा 76 रुग्ण होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन शिड्यांच्या मदतीने खाली काढले. मात्र नंतर ही आग प्रचंड वाढली असून अजून ही त्यात काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


या ठिकाणी मॉलमध्ये रुग्णालय कसे केले गेले या बद्दल महापौरांनी आश्चर्य व्यक्त केले असून या बाबत चौकशी होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  या आगीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले. बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बचाव कार्य संपल्यानंतर ही आग कशी लागली याची चौकशी करण्यात येणार असल्याचं महापौरांनी आणि उपायुक्तांनी स्पष्ट केलं.


सनराईज रुग्णालयच्या म्हणण्यानुसार, जे दोन रुग्ण दगावले ते आगीमुळे दगावले नाही. त्यांचा मृत्यू आगीमुळे झालेला नाही, आधीच कोव्हिड उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या फॉर्मलिटीज काम बाकी होते त्यामुळे शव रुग्णालयात होते. आग लागली तेंव्हा आलर्म वाजल्यानंतर ताबडतोब सर्व लाइट्स कनेक्शन बंद केले आणि रुग्णांना बाहेर काढले. 76 च्या आसपास रुग्ण आतमध्ये होते, त्यात दोन जणांचा आधीच मृत्यू झला होता. आता त्यांना जवळच्या मुलुंड जम्बो कोव्हीड सेंटर आणि फॉरटीस रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.