पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघा जणांना प्राण गमवावे लागले. दोन तरुण आणि एका महिलेचा या अपघातात मृत्यू झाला.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हालोली भागात हा अपघात झाला. कंटेनर, कार आणि बाईकमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर महिलेला उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले.
मृतांमध्ये दामखिंड भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघा जणांचा समावेश आहे. 28 वर्षीय निखिल काशिनाथ मेधवले, त्याची 55 वर्षीय आई कामिनी काशिनाथ मेधवले आणि 18 वर्षीय भाचा पुर्मय पाटील यांचा मृत्यू झाला.