Mumbai Accident News: मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेकडे (Jogeshwari East) एक धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी सळई खाली पडून रस्त्यावरून रिक्षाने प्रवास करणाऱ्या मायलेकीचा गंभीर अपघात झाला आहे. या दुर्दैवी अपघातात (Western Expressway) आईचा जागीच मृत्यू झाला असून सहा वर्षाच्या मुलीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. 


Mumbai Accident News: उपचारदरम्यान सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू 


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जोगेश्वरी पूर्वेकडील (Jogeshwari East) पश्चिम द्रुतगती महामार्ग (Western Expressway) लगत असलेल्या सोनार चाळ परिसरात मलकानी डेव्हलपर्सच्या बांधकाम साईटवर घडली आहे. आज संध्याकाळी 4 च्या सुमारास एक महिला आणि तिची लहान मुलगी जोगेश्वरी (Jogeshwari East) स्टेशन रोडवरून मेघवाडीच्या दिशेने रिक्षाने प्रवास करत होते. त्यावेळी पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ (Western Expressway)  एका इमारतीचा बांधकाम सुरू असताना त्या बांधकामच्या ठिकाणाहून चौथा मजल्यावरून लोखंडी सळई खाली पडली. ही सळई या मायलेकी प्रवास करत असलेल्या रिक्षावर पडली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी गंभीर जखमी झाली होती. या घटनेमध्ये सुदैवाने रिक्षा चालक सुखरूप वाचला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जोगेश्वरी (Jogeshwari East) पोलीस (Police) दाखल झाले. अपघातनंतर महिलेला आणि तिच्या मुलीला जवळच्या ट्रामा केयर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. जिथे महिलेला मृत घोषित करण्यात आले. तर मुलीचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. 


Mumbai Accident News: पोलिसांनी डेव्हलपरविरुद्ध दाखल केला गुन्हा 


सध्या जोगेश्वरी Jogeshwari East) पोलिसांनी (Police) या प्रकरणांमध्ये मलकानी डेव्हलपरचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच अपघात नेमका कसा झाला, यासाठी पोलीस (Police)  परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासून पाहत असून स्थानिक लोकांकडूनही याबाबत माहिती घेत आहेत. याआधीही येथे अशी घटना घडली आहे का? यात डेव्हलपरचा काही दोष आहे का? तसेच इमारतीचे बांधकाम करताना नियमनुसार, डेव्हलपरने बांधकाम सुरू असताना कोणालाही काही इज़ होऊ नये, यातही योग्य ती सुरक्षा व्यवस्था केली होती का? या संदर्भात अधिक तपास जोगेश्वरी पोलीस करत आहे.


इतर महत्वाची बातमी: 


Pune Mhada : सर्वकाही करुनही घराचं स्वप्न अधुरं! खासगी बिल्डरांकडून होणाऱ्या नागरिकांच्या फसवणूकीकडे म्हाडाकडून डोळे झाक; धक्कादायक आकडेवारी समोर