Mulayam Singh Yadav Health : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांची प्रकृती नाजूक आहे. हरियाणातील  (Haryana)  गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. मुलायम सिंह यांच्या प्रकृतीबाबत हॉस्पिटलच्या प्रशासनानं माहिती दिली आहे. मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीची माहिती  घेण्यासाठी प्रत्येक पक्षातील अनेक बडे नेते मेदांता हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टरही (Manohar Lal Khattar) यांनी देखील त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. तसेच बुधुवारी त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन माहिती घेतली.


मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती हॉस्पीटल प्रशासनानं दिली आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते हॉस्पीटलमध्ये पोहोचत आहेत. दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही रुग्णालयात पोहोचून अखिलेश यादव यांची भेट घेऊन मुलायम सिंह यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.


नेताजींच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा : मनोहर लाल खट्टर


हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे बुधवारी सुमारे अर्धा तास रुग्णालयात थांबले होते. तिथे त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मी अखिलेश यादव आणि डॉक्टरांशी चर्चा केली आहे. पूर्वीच्या तुलनेत मुलायम सिंह यादव यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा आहे. नेताजींच्या आरोग्यासाठी प्रार्थना आवश्यक असल्याचे मनोहर लाल खट्टर यांनी सांगितलं. दुसरीकडं, तेजस्वी यादव यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. मुलायम सिंह यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 2 ऑक्टोबरला मुलायम सिंह यादव यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.


प्रकृती सुधारण्यासाठी दिल्लीतील एम्स आणि लखनऊच्या डॉक्टरांचाही सल्ला


मुलायमसिंग यादव यांची प्रकृती सुधारण्यासाठी दिल्लीतील एम्स आणि लखनऊच्या डॉक्टरांचाही सल्ला घेण्यात येत आहे. लखनौ आणि दिल्लीतील तज्ज्ञांनी मेदांता रूग्णालयात येऊन सल्ला दिला आहे. तज्ज्ञांची टीम यादव यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असल्याची माहितीही डॉक्टारांनी दिली आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आणि कमी रक्तदाबाच्या तक्रारींमुळे मुलायम सिंह यादव यांना गेल्या महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर जनरल वार्डमध्ये उपचार सुरू होते. परंतु, रविवारी त्यांची पृकृती अचानक बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. 


महत्त्वाच्या बातम्या: