मुंबई : राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची मदत केली जात आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या काही महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळाले आहेत. तर महिलांच्या उर्वरित अर्जांची छाननी चालू आहे. दरम्यान, या योजनेसाठी काही महिला पात्र ठरलेल्या आहेत. पण अद्याप त्यांच्या बँक खात्यात पैसे आलेले नाहीत. काही महिलांना कागदपत्रांची अडचणी येत आहे. या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी महिलांनी नेमके काय करावे? असे विचारले जात आहे.
महिलांना मिळणार 4500 रुपये
आतापर्यंत कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्यांचे 3000 रुपये आले आहेत. 31 जुलैपर्यंत फॉर्म भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना हे 3000 रुपये देण्यात आले आहेत. आता 31 जुलैनंतर आलेल्या फॉर्मची छाननी चालू आहे. सप्टेंबर महिन्यात उर्वरित पात्र महिलांना एकूण तीन महिन्यांचे पैसे दिले जातील. म्हणजेच पात्र महिलांना तीन महिन्यांचे 4500 रुपये मिळतील.
आतपर्यंत 2 कोटींपेक्षा अधिक अर्ज
महाराष्ट्र सरकारनेल लागू केलेल्या या योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जातोय. या योजनेसाठी आतापर्यंत 2 कोटी 3 लाख 94 हजार 924 अर्ज आले आहेत. या सर्व अर्जांची सध्या छाननी चालू झाली आहे. लवकरचा आम्ही उर्वरित पात्र महिलांच्या बँख खात्यावर पैसे टाकू असे, आश्वासन राज्य सरकारने दिले आहे.
महिलांना येत आहेत अनेक त्रुटी
अर्ज दाखल करतानाची प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी राज्य सरकारने या योजनेच्या अर्ज प्रक्रियेत आतापर्यंत अनेक बदल केले आहेत. काही महिलांचे अर्ज डिसअप्रुव्ह (अमान्य) झाले आहेत. अशा महिलांना अर्जात दुरुस्ती करण्याची संधी आहे. पण ही दुरुस्ती कशी करावी? त्याबाबतची चौकशी नेमकी कुठे करावी? असा प्रश्न काही महिलांना पडला आहे. महिलांची तक्रार सोडवण्यासाठी एकूण दोन मंच उपलब्ध आहेत.
महिलांना येथे करता येणार तक्रार
लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना महिलांना काही अडचणी येत असतील तर त्या नारी शक्तीदूत अॅपवर त्याबाबत तक्रार करू शकतात. यासह महिला स्थानिक अंगणवाडी केंद्रावर जाऊन अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून त्यांची अडचण सरकारदरबारी मांडू शकतात.
हेही वाचा :
तुमच्या खात्यात अजून 3000 रुपये आले नाहीत? आता काय करावं? 'या' तीन गोष्टी समजून घ्या
लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी 'बँक सिडिंग स्टेटस' कसं चेक करायचं? जाणून घ्या A टू Z प्रक्रिया!