MPSC Result: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 6 आणि 20 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा - 2021 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा - 2021 मधील दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल आजhttps://mpsc.gov.in/ या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. एकूण 114 उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात आले आहे.
परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यातील आनंद नाना जावळे (बैठक क्रमांक - PN001205) हे राज्यातून व मागासवर्गवारीतून प्रथम आला आहे. महिला वर्गवारीतून सातारा जिल्हियातील अक्षता बाबासाहेब नाळे (बैठक क्रमांक - PN004320) या प्रथम आल्या आहेत.
उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे आयोगाने कळवले आहे.
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा- 2022 या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीरात क्रमांक 77/2022 ला अनुसरुन 5 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या "महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा- 2022" (लिपिक-टंकलेखक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, व उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, गट-क) या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आज आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब व गट-क संवर्गाच्या मुख्य परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रम
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-ब व महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट-क या दोन्ही संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता 15 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिध्द अभ्यासक्रम अधिक्रमित करुन प्रस्तुत दोन्ही संवर्गाच्या मुख्य परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI