सातारा  : सातारा जिल्हा सत्र न्यायालयात आज खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले (Minister Shivendraraje Bhosale) एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. जुन्या दोन प्रकरणावरुन हे दोन्ही राजे यावेळी उपस्थित राहिले होते. दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी माघारी घेतल्यामुळं खिंडवाडी येथील नवीन मार्केट कमिटीचे प्रकरण न्यायालयानं निकाली काढले आहे. तर सुरुची राडा प्रकरण सेशन कोर्टाकडून जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आलं आहे. 


नेमकं प्रकरण काय?


साताऱ्यातील 2017 मधील सुरुची राडा प्रकरण आणि नवीन मार्केट कमिटीतील जागेच्या वादावरून खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यासह मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. हे दोन्ही खटले सातारा न्यायालयात सुरु आहेत. या प्रकरणात आज दोन्ही राजे त्यांच्या गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले होते. यामध्ये आज न्यायालयाने खिंडवाडी येथील नवीन मार्केट कमिटीच्या प्रकरणाचा निकाल लागला. यामधील दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी आपल्या तक्रारी माघारी घेतल्यामुळे हा खटला जिल्हा सत्र न्यायालयाने निकाली काढला आहे. आनेवाडी टोल नाका व्यवस्थापनाच्या प्रकरणावरून 2017 मध्ये शिवेंद्रराजे यांच्या सुरुची निवासस्थानासमोर झालेल्या दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांमधील राडा प्रकरण हे गंभीर गुन्ह्यातील असल्यामुळं ते सेशन कोर्टातून हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. या दोन्ही खटल्यात सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दोन्ही राजेंनी उपस्थिती लावल्यामुळं मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी न्यायालयाच्या आवारात पाहायला मिळाली. 


महत्वाच्या बातम्या:


मेलो तर चालेल, पण याला खल्लास करणार अशी वेळ येऊ देऊ नका; महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवरून उदयनराजेंचा इशारा, सरकारकडे केल्या तीन मागण्या