Pune: विधानसभेत गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले आहे. अबू आझमींच्या वक्तव्यानंतर औरंगजेबाची कबर काढून टाका या मागणीसाठी आता विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलही आक्रमक झालाय. औसंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल असे म्हणत या दोन्ही संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यभर एकाच दिवशी औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन होणार असून सकरकारने कबरीबाबत निर्णय घेतला नाही तर मात्र आम्ळी बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करत ती कबर हटवू अशा इशारा बजरंग दलाने पुण्यात दिला आहे.
शिवजयंतीला राज्यभर आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर नको म्हणत आता विश्व हिंदू परिषद बजरंग दल आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे.. औरंगजेबाच्या कबरी विरोधात आक्रमक होत विश्व हिंदू परिषदेकडून आता राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.. शिवजयंती म्हणजेच 17 मार्च रोजी विश्व हिंदू परिषद राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कबर हटवा या मागणीसाठी आंदोलन करणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यादिवशी निवेदन देखील देण्यात येणार आहे.. राज्यभर एकाच दिवशी एकाच वेळी हे आंदोलन होणार असून जर या आंदोलनानंतर सरकारने या कबरी बाबत निर्णय नाही घेतला तर मात्र आम्ही बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करत ती कबर हटवू असा शारा बजरंग दलाने पुण्यात दिला आहे..
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छाावा चित्रपटात मुघल सम्राट औरंगजेबाला क्रूर शासक म्हणून दाखवण्यात आले आहे. यानंतर देशभरात औरंगजेबावर चर्चा सुरू झाली. दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाला ‘उत्तम प्रशासक’ म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभर मोठा वादंग उभा राहिला. त्यांच्या वक्तव्याविरोधात राज्यात बहुतांश ठिकाणी आंदोलने झाली. त्यांनी नंतर हे वक्तव्य मागे घेतले असून त्यांच्यावर अधिवेशन संपेपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही झाली. त्यानंतर आता औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महाराष्ट्रातील काही राजकीय आणि धार्मिक संघटना ही कबर हटवण्याची मागणी करत आहेत.