सातारा : राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन खासदार उदयनराजे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका आहे. खासदार, आमदारांचे दोन वर्षांचे निधी तुमच्याकडे घोटवून घेतले? त्याचं केंद्र, राज्याने काय केले ते गेले कोठे? गोर गरिबांना सुख-सुविधा मिळत नाहीत, याचं उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने दिलच पाहिजे, असा थेट सवाल उदयनराजे यांनी विचारला आहे. कोरोना परिस्थितीमुळे साताऱ्यातील दसरा उत्सव साध्यापणाने साजरा करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली.


कोरोनामुळे रुढी परंपरेला फाटा, जिव्हाळा, पाहुणे, मित्रमंडळी यांना या कोरोनाने हिरावले आहे, आईचरणी प्रार्थना आहे हे थांबलं पाहिजे. ज्याला दोन दिवसापूर्वी भेटलो ते दुसऱ्या दिवशी जातात याचं वाईट वाटतं. असे प्रत्येकावर क्षण आलेत, त्यात मी अपवाद नाही. यामुळे बुद्धी काम करायची बंद होते, खरंही वाटत नाही जो काल होता तो आज नाही. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या, अशी विनंती खासदार उदयनराजे यांनी केली.


त्या निधींचं केंद्र आणि राज्यानं काय केलं? : उदयनराजे


खासदार आणि आमदारां तुम्ही दोन वर्षांचे निधी तुमच्याकडे घोटवून घेतले त्याचं केंद्र आणि राज्य सरकारनं काय केलं ते गेले कुठे? दिवस रात्र एकच झाली आहे. आम्हाला बेड पाहिजेत, ऑक्सिजन पाहिजेत, असे फोन येतात. माझा एकच प्रश्न हे घोटून घेतलेले पैसे गेले कोठे? गोर गरिबांना सुख-सुविधा मिळत नाहीत. याचं उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने दिलच पाहिजे. आता लोकांनी जाब विचारणं गरजेचे आहे.


Corona | भारतात रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर; देशभरात जवळपास 71 लाख रुग्ण कोरोनामुक्त


राज्यकर्त्यांना चांगली बुद्धी..
गरीबांना जाऊन भेटतो तेव्हा ते म्हणतात आम्ही आता अंत्यसंस्काराची तयारी करत आहोत. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. थोडी लाज असेल तर संपूर्ण राज्यकर्त्यांनी याची उत्तरं दिली पाहिजेत. हे पैसे कोठून आणणार. इतकी लोकं का मरत आहेत? गोरगरीब कुठून चार आणि पाच लाख रुपये आणणार (बाईट सुरु असतानाच उदयनराजेंचे देवीला हात जोडून साकड) हे देवी या राज्यकर्त्यांना चांगली बुद्धी द्या आणि सांगा त्यांना ज्या लोकांना या जनतेने निवडून दिलयं त्यांची काळजी घ्या.


तुम्ही जर त्या विश्वासाला पात्र राहिला नाही तर तुमची त्या पदावर राहायची लायकी नाही. गाडी थांबवल्यावर लोकं विचारतात तुम्ही काय करता? त्यांना काय उत्तर देऊ. तुम्ही तर सगळ कलेक्टरच्या हातात दिलंय. त्यांनी थोडातरी आमचा अभिप्राय घेतला पाहिजे. तुम्ही राबवणार कशी ही सर्व यंत्रणा. रेव्हिनीव डिपार्टमेंटचा काय संबंध. हा पैशाचा नुसता खेळ चाललाय. कोठे जातात हे पैसे ते तपासले पाहिजेत. घेतायत तर त्याला जबाबदार कोण? अशी परिस्थिती तुमच्यावर (लोकप्रतिनिधींवर) आली तर तुम्ही काय करणार? अशी परिस्थिती कोणावर येऊ नये अशी देवी चरणी मी प्रार्थना करतो, असे उदयनराजे म्हणाले.