नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील लढाईत भारताने आणखी एक यश मिळवलं आहे. देशात रोज नव्यानं नोंद होणाऱ्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची रिकव्हरी रेट 90 टक्के इतका झाला आहे. गेल्या 24 तासात 50,129 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 62,077 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले. देशात सध्या 6 लाख 68 हजार 154 अॅक्टिव रुग्ण आहेत. संपूर्ण कोरोना बाधित संख्येचे तुलनेत हे प्रमाण 8.50 टक्के आहे तर आतापर्यंत 70 लाख 78 हजार 123 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.


देशात सक्रिय आणि बरे झालेल्या केसेसमधील दरी सतत वाढत आहे. देशात सक्रिय आणि बरे झालेल्या रूग्णांमधील फरक 64 लाखांपेक्षा जास्त आहे. आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी सांगण्यात आले की, गेल्या एका आठवड्यात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या एक हजाराहून कमी झाली आहे, तर 2 ऑक्टोबरपासून ही संख्या 1100 पेक्षा कमी राहिली आहे.


Corona Vaccine | कोरोनावरील स्वदेशी लस 60 टक्के प्रभावी असण्याची शक्यता, भारत बायोटेकचा दावा


मागील 24 तासांत 50 हजार 129 नवीन कोरोना रुग्णांमध्ये 79 टक्के रुग्ण हे फक्त 10 राज्यातील आहेत. सर्वाधिक नवीन रुग्णांच्या बाबतीत केरळने महाराष्ट्राला मागे टाकले आहे. एकीकडे, महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे आणि केरळमध्ये हा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 8253, महाराष्ट्रात 6417 आणि कर्नाटकात 4,471 रुग्ण आढळले. पश्चिम बंगालमध्ये 4,148 लोक संसर्गित झाले आणि दिल्लीमध्ये 4,116 लोकांना या विषाणूची लागण झाली. त्यानंतर आंध्र प्रदेश (3434), तामिळनाडू (2886), उत्तर प्रदेश (2178), छत्तीसगड (2011) आणि राजस्थान (1852) यांचा क्रमांक लागतो.


गेल्या 24 तासात कोरोनामुळे 578 लोकांचा मृत्यू झाला, त्यातील 80 टक्के रुग्ण केवळ 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 137 लोकांचा मृत्यू, पश्चिम बंगालमध्ये 59 लोकांचा मृत्यू, छत्तीसगडमध्ये 55 लोकांचा आणि कर्नाटकात 52 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Corona Vaccine | काही राज्यांकडून मोफत लशीबाबत घोषणा, महाराष्ट्र सरकार मोफत लस देणार का?