नवी मुंबई : मराठा नेत्यांमधील मतभेद मिटवण्यासाठी नवी मुंबईत आज मेगा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले दोघेही उपस्थित राहणार असल्याचं बोलंल जात होतं. परंतु, आता या बैठकीला उदयनराजेंनी पाठ फिरवली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, नवी मुंबईतील मराठा समाजाच्या या बैठकीसाठी थोड्याच वेळात खासदार संभाजीराजे छत्रपती पोहचणार आहेत. तसेच राज्यातील सर्व संघटनांचे समन्वयक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबईत पार पडणाऱ्या या बैठकीत इडब्ल्यूएसच्या लाभावर खलबतं होणार असल्याचं बोलंलं जात आहे.

Continues below advertisement


नवी मुंबईतील मराठा समाजाच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या बैठकीला संभाजीराजे छत्रपती काही वेळातच पोहचणार असून राज्यातील सर्व संघटनांचे समन्वयक या बैठकीला उपस्थित राहणार आहे. अशातच मराठा समाजासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या या बैठकीला उदयनराजे भोसले मात्र उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच येत्या 15 दिवसांतच उदयनराजे स्वतः बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे. साताऱ्यात ते राज्यव्यापी मेळावा भरवणार असून या मेळाव्यासाठी संभाजीराजे आणि शिवेंद्रराजेंनाही निमंत्रण दिलं जाणार असल्याचं बोलंलं जात आहे.


मराठा आरक्षणाच्या लढ्यासंदर्भात कोल्हापूरने महाराष्ट्राला दिशा द्यावी : खासदार संभाजीराजे


अनेक मराठा तरुणांना नियुक्ती ऑर्डर मिळाली पण कामावर घेतलं जातं नाही. आरक्षण मिळेल, पण तुमच्या हातात जे आहे ते आधी करा, याला इशारा समजा किंवा विनंती, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला. नोकरीबाबत वकिलांनीही सरकारला जाब विचारावा. शिवाय 2014 ते 2020 पर्यंत नियुक्त्या का झाल्या नाहीत? त्या विरोधात याचिका दाखल करू, असा इशारा देत आरक्षणाच्या लढ्या संदर्भात कोल्हापूरने महाराष्ट्राला दिशा द्यावी, असं देखील संभाजीराजेंनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी कोल्हापुरात न्यायिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.


या परिषदेला अॅड. श्रीराम पिंगळे, अॅड. आशिष गायकवाड, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात, प्रा. जयंत पाटील, अॅड. रणजीत गावडे, जयेश कदम, दिलीप पाटील, दिलीप देसाई हे सर्व उपस्थित राहिले होते. या परिषदेत कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील वकील सुद्धा उपस्थित राहिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरची लढाई तर केलीच आता न्यायालयीन लढाईसाठी अधिक बळकट होण्याची गरज असून त्यासाठीच आज कोल्हापूरात न्यायिक परिषद पार पडली.


महत्त्वाच्या बातम्या : 


मराठा आरक्षणाच्या लढ्यासंदर्भात कोल्हापूरने महाराष्ट्राला दिशा द्यावी : खासदार संभाजीराजे