सांगली : सांगलीच्या जत तालुक्यातील उमराणी ऊसाच्या फडात गांजा शेती केली जात असल्याचं उघड झालं. यानंतर सांगली पोलिसांनी छापा टाकून शेती उद्ध्वस्त केली आणि गांजाची 147 किलो वजनाचा ओला गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. या गांजाच्या झाडांची किंमत तब्बल 17 लाख आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.


पोलीस अधीक्षक दिक्षीत गेंडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी सांगली जिल्हयात गांजाची लागवड करणाऱ्या आणि गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी कारवाईसाठी पथक तयार केले होते. पोलिसांनी उमराणीतील ऊसाच्या फडात छापा टाकून गांजा शेती उद्ध्वस्त केली. यावेळी सुमारे 17 लाख 76 हजार किंमतीची 147 किलो गांजाची झाडं जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी शेतमालकाला अटक करण्यात आली.



जत तालुक्यातील उमराणी या ठिकाणी एका गांजाची शेती करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मल्लापा बिराजदार यांच्या शेतात छापा टाकला. यावेळी इथे ऊसाच्या शेतीच्या आड गांजाची शेती केली जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या शेतातील सर्व गांजाची झाड उखडून टाकत जप्त केली. सुमारे 147 किलो हे गांजाची झाड असून त्यांची किंमत सुमारे 17 लाख 67 हजार रुपये इतकी आहे. या गांजा शेती प्रकरणी मल्लाप्पा बिराजदार या शेतमालकाला पोलिसांनी अटक केली आहे.


जत तालुक्यातल्या पूर्व भागात अनेक ठिकाणी गांजा शेती करण्यात येत असल्याचे अनेक वेळा समोर आलं आहे. पोलिसांनी या विरोधात वेळोवेळी कारवाई केली आहे, मात्र तरीही इथे गांजाची शेती करणं हे सुरुच असल्याचं या कारवाईनंतर पुन्हा एकदा समोर आलं आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, सपोफी अच्युत सुर्यवंशी, राजेंद्र मुळे, जितेंद्र जाधव, आमसिध्दा खोत, राजू शिरोळकर, महादेव धुमाळ, सचिन कुंभार, मुदत्तसर पाथरवट, राहुल जाधव, प्रशांत माळी, अरुण सोकटे यांनी पार पाडली.