Supriya Sule on Ajit Pawar : मी भावासोबत (अजित पवार) (Ajit Pawar) गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते. पण मी माझ्या 80 वर्षाच्या स्वाभिमानी वडिलांसोबत उभी राहिले याचा मला अभिमान असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलं. महिलांना सत्तेपेक्षा स्वाभिमान जास्त महत्वाचा असतो असंही सुळे म्हणाल्या.
माफी मागणारे कोर्टातील केस मागे घेणार का?
आता अनेकजण माफी मागत आहेत, पण माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा हा मनाने मोठा असतो पण माफी मागणारे स्वतःची चूक मान्य करत असतील ते कोर्टातील केस मागे घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला. सध्या न्यायालयात सुरु असलेली लढाई ही फक्त पक्ष आणि चिन्हाची नाही तर ती नैतिकतेची लढाई आहे. कारण पक्ष आणि चिन्ह ओरबाडून घेणे हा आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजींचा घात केला असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे पारोळा येथे आयोजित महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित महिलांना सुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्या बोलत होत्या.
कधीही दिल्ली समोर मुजरा करणार नाही
मी कष्टाची परिकाष्टा करेन आणि सत्याच्या मार्गाने चालेन पण कधीही दिल्ली समोर मुजरा करणार नाही, असे ठामपणे सांगितले. तसेच देशातील जनता खोकेवाली नाही, तर इमानदार आणि प्रामाणिक आहे, हे त्यांनी लोकसभा निकालात दाखवून दिल्याचे सुळे म्हणाल्या. त्यामुळं आता पुढील 90 दिवस आपल्याला स्वाभिमानासाठी लढायचे आहे. आपली सत्ता आल्यानंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हमीभावासंबंधीचा घेईल असे आश्वासनी यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.
दोन पक्ष फोडण्याचे फडवणीसांना कौतुक वाटत असेल तर दुर्दैव
एक देश एक निवडणुकीचा नारा देणारे सरकार महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकलत आहे. याचा अर्थ सरकार डर रही है, कारण राज्यातील महायुतीचे नेते निष्क्रिय असल्यामुळेच प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्रात यावे लागत आहे. असे असेल तर तो महाविकास आघाडीचा विजय असल्याचे सुळे म्हणाल्या. दोन पक्ष फोडण्याचे देवेंद्र फडवणीस यांना कौतुक वाटत असेल तर ते दुर्दैवी असल्याचे सुळे म्हणाल्या. मी पक्षाकडे खासदरकीचे तिकीट सोडून काहीही मागत नव्हते कारण संसदेत पहिला नंबर येत असल्यामुळे मी मेरिटवर खासदारकीचे तिकिट मागितले, तर तो गुन्हा आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या:
सुप्रियांच्या लाडक्या भावाने रंग बदलला, पिंक झाला पण रंग तर सरडा बदलतो; संजय राऊतांचा हल्लाबोल