Maratha Reservation: विलगीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा (Maharashtra ST Strike) मागील काही दिवसांपासून संप सुरू आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप तोडगा निघाला नसल्यानं विरोधकांनी राज्य सरकारवर टीका सुरु केलीय. यातच मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करीत खासदार संभाजीराजें (Sambhaji Raje) अक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं काही निर्णय घेतला नाही तर, आमच्याकडं दुसरा पर्याय राहणार नाही. तसेच पुणे ते मुंबई लॉंग मार्च निघणार, असाही इशारा त्यांनी दिलाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरही त्यांनी भाष्य केलय. 

 

"मी नेहमीच मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्र आणि राज्य सरकारसमोर मांडलाय. तसेच त्यांची जबाबदारी काय? हे ही मी सांगितलंय. आरक्षणाचा विषय लगेच मार्गी लागण्यासारखा नाही. परंतु, राज्य शासनानं मागासवर्गीय आयोग स्थापन अथवा कमिटी करण्याची जबाबदारी घ्यायला हवी. यातून सर्वेक्षण करायला हवं. कारण सामाजिक मागास राहिलेलाच नाही. सामाजिक मागास सिद्ध करण्यासाठी हे पहिलं नियोजन आहे. पुढचं हे काहीच होत नसेल तर केंद्रात जाऊ. पण सध्या केंद्राचा विषय नाही", असंही त्यांनी म्हटलंय.

 

"सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पाच मूलभूत सुविधा तुम्ही समाजाला देऊ शकता, याव्यतिरिक्त आमची दुसरी मागणी नाही. मात्र, त्यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळं मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायचं ठरवलेलं आहे. पुन्हा मी त्यांना थोडा वेळ देत आहे. त्यात जर त्यांनी काही निर्णय घेतला नाही तर, आम्हाला दुसरा काही पर्याय राहणार नाही. पुणे ते मुंबई लॉंग मार्च निघेल, असाही इशाराही त्यांनी दिलाय. 

एसटी कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारनं योग्य तो निर्णय लवकर घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला तातडीनं बोलावून घ्यावं. एसटी कर्मचारी अजून किती दिवस आझाद मैदानावर बसणार आहेत? सामान्यांना वेठीस धरून एसटी कर्मचाऱ्यांना अजिबात आनंद होत नाही. बाकीची सगळी कामं ठप्प करा, ताबोडतोब मिटिंग लावा आणि या कामगारांना दिलासा द्या, अशीही विनंती संभाजीराजे यांनी राज्य सरकारकडं केलीय. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 

हे देखील वाचा-