MP Fauzia Khan on Chandrakant Patil : राज्यभरातील मुलींना मोफत शिक्षक देण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) केली होती.  मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. यामुळेच राज्यात शिक्षणाचा खर्च झेपत नसल्याने मुलींच्या आत्महत्या होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार डॉ फौजिया खान (MP Fouzia Khan) यांनी केलाय. तात्काळ या घोषणेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी फौजिया खान यांनी केलीय.


शिक्षणाचा खर्च झेपत नसल्याने परभणीच्या आहेरवाडी आणि लातूर मधील विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील आहेरवाडी येथील दीपिका खंदारे या मुलीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या कुटुंबाला भेट देऊन खासदार फौजिया खान यांनी सरकारला लक्ष केलं आहे. लवकरात लवकर या घोषणेची अंमलबजावणी केली गेली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असल्याचेही खान यांनी म्हटले आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते विजय गव्हाणे यांनी या घोषणेच्या अनुषंगाने सरकारवर टीका केली.  


चंद्रकांत पाटलांनी नेमकी काय केली होती घोषणा?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वाढदिवसावेळी म्हणजे 9 फेब्रुवारी 2024 रोजी चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल अशी घोषणा केली होती. ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्या मुलींना वैद्यकीय,अभियांत्रिकी,लॉ,असो की 662 कोर्सेस असून यासाठी कुठलीही फी लागणार नाही, शिक्षण मोफत करणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. पण ही घोषणा हवेतच जिरल्याची चर्चा आहे. कारण, अर्धा जून महिना उलटला, महाविद्यालयात प्रवेशही सुरू झाले. मात्र राज्य सरकारचा ना जीआर निघाला, ना अंमलबजावणी झाली. प्रवेशासाठी मुलींना भरमसाठ फी भरावी लागतेय. महाविद्यालयाच्या भरमसाठ फी मुळे अनेक मुलींना दुय्यम दर्जाचे शिक्षण घ्यावे लागते, किंवा शाळाच सोडावी लागते. काही जणांनी आत्महत्या केल्याचीही घटना घडल्या आहेत. परभणीमध्ये गेल्यावर्षी एका मुलीने महाविद्यालयाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली होती. त्याची दखल घेत राज्य सरकारकडून मोफत शिक्षणाची मोठी घोषणा केली होती. मात्र, या घोषणेनंतर पुढे काहीच झालं नाही. याची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळं सर्वच विरोधा पक्षांनी चंद्रकांत पाटलांसह भाजपला चांगलेच धारेवर धरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं आता सरकार काय निर्णय घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


महत्वाच्या बातम्या:


ना जीआर, ना अंमलबजावणी; मुलींना मोफत शिक्षणाची चंद्रकांत पाटलांची घोषणा हवेतच जिरली?