कोल्हापूर : खासदार संभाजीराजे नेहमीचं सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांचं आयुष्य समजावून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मग कधी ते पाण्यात उतरून पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जातात तर कधी रायगडावर साहित्य पोहचवण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येतात. आज त्यांनी शेतकऱ्याच्या सोबत पेरणी केली. यावेळी आलेला अनुभव त्यांनी फेसबुक वर पोस्ट केला आहे. शेतकऱ्याच्या पायाला भेगा का पडतात? स्वतःच्या घामाने धरतीला भिजवून जगाला पोसणाऱ्या बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात? याचा अनुभव घेता आल्याचे त्यांनी म्हटलंय.


खासदार संभाजीराजे नेहमीचं आपले अनुभव सोशल मीडियावर शेअर करतात. आज त्यांनी शेतकऱ्यासोबतचा अनुभव लिहला आहे. शेतकऱ्याला किती कष्ट पडतात हे सांगताना ते म्हणाले, तिफणीला ओढताना एका फेरीतच माझा श्वास फुलून गेला, मला लगेच मास्क काढून ठेवावा लागला. कोरोनामुळे संपूर्ण जगाला थांबावं लागलं. पण बळीराजाला थांबून चालणार नाही, अन् तो थांबणारही नाही.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या रायगड दौऱ्यावर, चक्रीवादळग्रस्तांना मदतीचं वाटप


मी स्वतःच्या शेतातून घरी येत असताना, वाटेत एक संपूर्ण कुटुंब शेतात पेरणी करत असताना दिसले. गाडी पुढे गेली, पण मला ते दृश्य पाहून राहवलं नाही. परत गाडी वळवली आणि त्यांच्याकडे गेलो. सुरुवातीला संकोच वाटला की मी कसा जाऊ? त्यांना कसं विचारू? परंतु न कळत मी त्यांच्या रानात ओढला गेलो. हा अनुभव मला समृद्ध करून गेला. जगाच्या पोशिंद्या शेतकरी राजाचे संपूर्ण जगाने ऋण व्यक्त करत त्यांचा सन्मान केला पाहिजे, असं संभाजीराजे यांनी म्हणलंय.





ट्विटरवर व्हिडीओ शेअर
खासदार संभाजीराजे यांनी या प्रसंगाचा व्हिडीओ ट्विटर वरही पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी लिहलं आहे की, शेतकऱ्याच्या पायाला भेगा का पडतात? स्वतःच्या घामाने धरतीला भिजवून जगाला पोसणाऱ्या बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात? याचा अनुभव घेता आला. तिफणीला ओढताना एका फेरीतच माझा श्वास फुलून गेला, मला लगेच मास्क काढून ठेवावा लागला.


Coronavirus | कोरोनाचे रिपोर्ट रखडवणाऱ्या लॅबवर मुंबई पालिकेची कारवाई