देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Rain Alert : वरुणराजा बरसणार ! आज विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील हवामानात बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. देशात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता (Unseasonal Rain) आहे. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात आज पाऊस (Rain Alert) पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यासह देशात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. रविवारीही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर...
LPG Gas Cylinder : एलपीजी सिलेंडर स्वस्त! नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा
LPG Gas Cylinder Price Today : नवीन आर्थिक वर्षाच्या (New Financial Year) पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Price Rate) दरात कपात करण्यात आली आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. आज गॅस सिलेंडरच्या दरात 30 रुपयांहून अधिक कपात करण्यात आली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर आता 30.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. वाचा सविस्तर...
New Financial Rules : आजपासून या नियमांमध्ये बदल; नव्या आर्थिक वर्षात खिशाला झळ
New Financial Year 2024-25 : आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत असून अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल झाला आहे. नवीन आर्थिक वर्ष लागू झाल्याने आजपासून काही नवे नियमही लागू झाले आहेत. 2024-2025 हे आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू झालं आहे. या नवीन वर्षात कोणते नियम बदलले आहेत. वाचा सविस्तर...
Top 20 Stocks : जागतिक बाजारात तेजीचा भारतीय बाजारावर परिणाम, या 20 स्टॉक्सवर असेल सर्वांची नजर
Top 20 Stocks for Today : सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातून सकारात्मक संकेत मिळत आहे. ग्लोबल मार्केटमध्ये निफ्टी वाढीसह 22500 च्या पुढे व्यवहार करत आहे. अमेरिकेच्या वायदा आणि आशियाई बाजारातही तेजी पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांचा खरेदीकडे कल असल्याचं दिसत आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर...
Narsing Udgirkar : लातूरमध्ये तिरंगी लढत, सव्वा लाख मतं घेणाऱ्या वंचितकडून उदगीरकरांना तिकीट; मविआचं टेन्शन वाढलं!
लातूर : वंचित बहुजन आघाडीने (Vancht Bahujan Aghadi) यंदाची लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाने नुकतेच 11 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. या पक्षाने माढा, सोलापूर (Solapur) यासारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांत आपले उमेदवार दिले आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यातही या पक्षाने नरसिंग उदगीरकर (Narsing Udgirkar) यांना तिकीट दिले आहे. उदगीरकर यांच्या उमेदवारीमुळे लातूरची (Latur) तिरंगी लढत होणार असून येथे महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसू शकते. सध्या या जागेवर भाजपचा खासदार आहे. वाचा सविस्तर...
IPL 2024 Latest Points Table: दिल्लीविरुद्धच्या पराभवामुळे चेन्नईचं मोठं नुकसान; अव्वल स्थान गमावलं, कोणी पटकावलं?, पाहा Latest Points Table
IPL 2024 Latest Points Table : चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 31 मार्च रोजी सामना झाला. दिल्लीने प्रथम खेळताना 191 धावा केल्या होत्या, पण चेन्नईला 20 षटकांत केवळ 171 धावा करता आल्या आणि 20 धावांनी सामना गमवावा लागला. वाचा सविस्तर...
Horoscope Today 1 April 2024 : आजचा सोमवार खास! भोलेनाथांची 'या' राशींवर राहणार विशेष कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं राशीभविष्य
Horoscope Today 1 April 2024 : पंचांगानुसार, आज 1 एप्रिल 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आज तुमच्यावर एखादी मोठी जबाबदारी येऊ शकते. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...