LPG Gas Cylinder Price Today : नवीन आर्थिक वर्षाच्या (New Financial Year) पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Price Rate) दरात कपात करण्यात आली आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. आज गॅस सिलेंडरच्या दरात 30 रुपयांहून अधिक कपात करण्यात आली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर आता 30.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे.


निवडणूकीपूर्वी एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात


गेल्या तीन महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा फटका बसताना पाहायला मिळत होता. मात्र, आता तीन महिन्यानंतर गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. 1 एप्रिल 2024 रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात 30.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे.


तीन महिन्यानंतर एलपीजीच्या दरात घसरण


मागील तीन महिन्यापासून एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा भडका उडाला होता. मार्च महिन्यात गॅस सिलेंडरचे दर 25.50 रुपयांनी वाढले होते. त्याआधी फेब्रुवारी महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 14 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याशिवाय जानेवारी महिन्यातही एलपीजी सिलेंडर 1.50 रुपयांनी महागला होता. आता तीन महिन्यानंतर एलपीजी स्वस्त झाला आहे.


गॅस सिलिंडरच्या दरात किती बदल?


IOCL नुसार, दिल्लीत 19 किलो LPG सिलेंडरची किंमत आजपासून 1764.50 रुपये झाली आहे. मार्च महिन्यात व्यावसायिक एलपीडी गॅस सिलेंडरची किंमत 1795 रुपये होती. याशिवाय गॅस सिलेडरच्या किंमत कपातीनंतर आता कोलकात्यात सिलेंडर 1879 रुपये आहे. पूर्वी ही किंमत 1911 रुपये होती. गॅस सिलेंडर स्वस्तर झाल्यानंतर मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1717.50 रुपये झाली आहे, जी किंमत आधी1749 रुपये होती. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेडर आता 1930 रुपयांना मिळणार आहे.


गॅस सिलेंडर कुठे, किती रुपयांनी स्वस्त?



  • दिल्लीत एलपीजी सिलेंडरचे दर 30.50 रुपयांनी कमी झाले आहेत. 

  • कोलकात्यात गॅस सिलेंडरच्या किमती 32 रुपयांनी कमी झाल्या 

  • मुंबईत गॅस सिलेंडरचे दर 31.50 रुपयांनी कमी झाले आहेत.

  • चेन्नईमध्ये सिलेंडरच्या किमती 30.50 रुपयांनी कमी झाल्या आहेत.


घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे दर काय?


घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.  घरगुती एलपीजी सिलेंडर म्हणजे 14.2 किलो गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.