Monsoon Withdrawal : नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणजेच मॉन्सूनने (Monsoon) आता परतीच्या प्रवासाला सुरवात केली आहे. मुंबई, पुणे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागातून देखील मान्सूनची परतीची वाटचाल सुरू झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली आहे. मुंबई आणि पुण्यातून मोसमी वारे माघारी फिरले असून महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसानं (Rain) दडी मारली आहे. काही भागत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. राज्यात यंदा उशिराने मान्सून दाखल झाला. दरवर्षी जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येणारा येणारा मान्सून यंदा 25 जूनला दाखल झाला. गेल्या वर्षी मुंबईतून 23 आॅक्टोबर रोजी राज्यातून मान्सून माघारी परतला होता. मान्सून राज्यातून माघारी परतण्यात सुरूवात झाली असली तरी राज्यात काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे.
मान्सून परतण्यासाठी पाच ते दहा दिवस
राज्यातून मान्सून जाण्यासाठी पाच ते दहा दिवस लागतात. 10 ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्यातील बऱ्याच भागातून माघारी फिरलेला असतो. 1975 ते 2022 या कालावधीत आतापर्यंत मान्सून परतीच्या तारखांवर नजर मारल्यास लक्षात येते की, 2005 साली 2 सप्टेंबरला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्यानतंर 2007 साली 30 सप्टेंबरला परतीचा प्रवास सुरू झाला होता. म्हणजे मान्सूनच्या आगमनाच्या तारखांपेक्षा मान्सूनच्या परतीच्या तारखांमध्ये विविधता दिसून येते.
पुढील दोन-तीन दिवसांत मान्सून माघार घेणार
नैऋत्य मान्सूनने 3 ऑक्टोबर 2023 रोजी उत्तर भारतातील बहुतांश भागांतून माघार घेतली आहे. उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि राजस्थान आणि गुजरातमधील उर्वरित भागांमधूनही मान्सून माघारी परतला आहे. जम्मू-काश्मीर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, उर्वरित गुजरात, पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून दोन-तीन दिवसांत नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. यावर्षी भारतात मान्सूनचा पाऊस 2018 नंतरचा सर्वात कमी राहिला आहे. 'एल निनो' हवामानाच्या पॅटर्नमुळे (El Nino weather pattern) ऑगस्ट महिना शतकातील अधिक काळ सर्वात कोरडा ठरल्याचे भारतीय हवामान विभागाने शनिवारी सांगितले.
हे ही वाचा :