मुंबई : राज्यातून नैऋत्य मान्सून (Monsoon) आठवड्याच्या शेवटी माघारी फिरण्यास अनुकूल वातावर निर्माण झाले आहे. आठवड्याच्या शेवटी मान्सून महाराष्ट्रातून एक्झिट घेणार आहे. 10 ऑक्टोबरनंतर मुंबईतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.  राज्यात पुढील काही दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज कायम  आहे.  महाराष्ट्रात (Maharashtra Rain) यंदा समाधानकारक पाऊस  झाला आहे.  राज्यात एकूण सरासरीच्या  97 टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.  पुढील काही दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज कायम आहे. 


राज्यात काही ठिकाणी पावसाने दडी मारल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे.   भारतीय हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार सांगलीत चार महिन्यात सरासरी 486.1 पाऊस होत असतो. मात्र यंदा 272.7  मिमी पावसाची नोंद झाली आहे. सांगलीत 44 टक्के पावसाची तूट पाहायला मिळत आहे. तर  साताऱ्यात यंदा फक्त 535.6 मिमी पाऊस झाला आहे. सरासरी 844.6 मिमी पाऊस होत असतो.  37 टक्के पावसाची तूट आहे.  राज्यातील पालघर, मुंबई उपनगर, ठाणे आणि नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. 


मराठवाड्यातील जालन्यात सरासरीपेक्षा मोठी तूट


सोलापुरात सरासरी 458.1 मिमी पावसाची नोंद होत असते मात्र यंदा फक्त 319 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोलापुरात 30 टक्के पावसाची तूट आहे. मराठवाड्यातील जालन्यात सरासरीपेक्षा मोठी तूट निर्माण झाली आहे.  जालन्यात सरासरी 591.8 मिमी पाऊस होत असतो. मात्र यंदा 398  मिमी पावसाची नोंद झाली आहे. 33 टक्के पावसाची तूट आहे. बीडमध्ये 21 टक्के तूट आहे. बीडमध्ये सरासरी 557.4  मिमी पाऊस होत असतो. मात्र यंदा 438 मिमी पावसाची नोंद झाली आहे 


पश्चिम विदर्भातील दोन जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट


उस्मानाबादेत प्रत्यक्षात 442.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. उस्मानाबादेत सरासरी 579.6  मिमी पावसाची नोंद होत असते. मात्र यंदा 24  टक्क्यांची तूट आहे. हिंगोलीत 583.8  मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा 23 टक्के पावसाची तूट दिसते आहे . पश्चिम विदर्भातील दोन जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट दिसते आहे, ज्यात अकोल्यात प्रत्यक्षात 532.9 मिमी पाऊस झाला असून सरासरी 694.2 मिमी पाऊस होत असतो अशात 23 टक्के पावसाची तूट दिसते आहे. अमरावतीत सरासरी 822.9  मिमी पाऊस होत असतो, प्रत्यक्षात 604.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे, अमरावतीत 27 टक्के पावसाची तूट पाहायला मिळते. 


हे ही वाचा:


Weather Update : मुंबईसह राज्यात मान्सूनची हजेरी! परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही 'या' भागात जोरदार पावसाचा अंदाज