Weather Update Today : देशासह राज्यात मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला (Monsoon) सुरुवात झाली आहे. मुंबईसह (Mumbai) राज्यात (Maharashtra Weather Update) काही भागांत परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणेसह कोकण किनारपट्टी भागात पावसाच्या सरी कोसळत आहे. शनिवारी मुंबईला पावसानं झोडपलं, तर ठाणे जिल्ह्यातही पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. आजही मुंबईसह उपनगरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण कोकण आणि गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रविवारी मुसळधार पाऊस (Maharashtra Weather News) झाला आहे. आजही या भागांत पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस
राज्यात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून काही भागांत विजांचा कडकडाट (Lighting) आणि वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आहे. कोकण किनारपट्टीला (Kokan Region) मुसळधार पावसाचा तडाखा बसला. सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातही (Madhya Maharashtra) रिमझिम पाऊस पाहायला (Weather Update Today) मिळाला. कोकण किनारपट्टी आणि गोव्यात आजही जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईत जोरदार पाऊस
मुंबईमध्ये आज ढगाळ वातावरण राहणार आहे. काही भागांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर काही भागात पावसाची रिमझिम पाहायला मिळेल. रविवारी मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली. लालबाग, परळ भागात जोरदार पाऊस झाला. मुंबई उपनगरात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. ठाणे जिल्ह्यात रविवारी अधूनमधून पावसाची रिपरिम सुरु होती. आज ठाणे जिल्ह्यात काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तसेच हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची ही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
'या' राज्यांना ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने (Weather News) दिलेल्या माहितीनुसार, 2 ऑक्टोबर रोजी, उत्तर ओडिशा, बिहार, झारखंड, सिक्कीम, उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. हवामान विभागाने (IMD) ओडिसा, झारखंड राज्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. छत्तीसगड आज आणि उद्या पूर्व मध्य प्रदेशात आणि छत्तीसगडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर, काही भागांत विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. उत्तर छत्तीसगडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :