India Monsoon News : सर्वांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे आज (30 मे) मान्सून (Monsoon) केरळमध्ये (Keral) दाखल झाला आहे. 31 मे रोजी मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, एक दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान, मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात काय स्थिती असणार याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. 


1 जून ते 3 जूनर्यंत राज्यात पावसाची शक्यता


मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील खान्देश, विदर्भ, मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात, शनिवार दिनांक 1 जून ते सोमवार 3 जूनर्यंत वारा-वावधानासह गडगडाटी वळीव पावसाची शक्यता जाणवते. तर तो पर्यंतच्या पुढील 2 दिवसात मात्र उष्णतेत अजुन वाढ होण्याची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात मात्र आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे एक जूनपर्यन्त, सध्या चालु असलेल्या ढगाळयुक्त दमटयुक्त उष्णतेचे वातावरण कायम असेल. दरम्यान, केरळमध्ये आज मान्सूनचे आगमन झाले आहे. यानंतर महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होमार याची चर्चा सुरु आहे. तर 7 ते 8 जूनला राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


 देशाच्या पूर्वोत्तर भागातील 7 राज्यातही मान्सूनने केला प्रवेश


दरम्यान, आज मान्सून केरळ राज्याच्या दक्षिण टोकावर आज पोहोचून तिथे सक्रिय झाला आहे. यावर्षीची त्याची आगमन भाकित तारीख 31 मे 2024 च्या अगोदर एक दिवस तर दरवर्षी असणारी त्याची सरासरी 1 जून तारखेच्या अगोदर दोन दिवस तो देशाच्या भू- भागावर प्रवेशित झाला आहे. मान्सून केरळ राज्याबरोबरच देशाच्या पूर्वोत्तर भागातील 7 राज्यातही त्याने प्रवेश केला आहे. मान्सून केरळ राज्याच्या टोकावरील सक्रियतेंनंतर उर्वरित केरळाचा बराचसा भाग, कन्याकुमारी, दक्षिण तामिळनाडू, मालदीव व लक्षद्विप भागापर्यंत त्याने आज मजल मारली आहे.


मुंबईसह कोकणातील उष्णता कायम राहणार


मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात मात्र आजपासुन पुढील 3 दिवस म्हणजे एक जूनपर्यन्त, सध्या चालु असलेल्या ढगाळयुक्त दमटयुक्त उष्णतेचे वातावरण कायम राहणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. आज व उद्या गुरुवार- शुक्रवारी (30-31 मे ला) खान्देश व मराठवाड्यातील 11 जिल्ह्यात उष्णता सदृश्य लाट टिकून राहणार आहे. तर खान्देशात रात्रीचाही उकाडा जाणवेल अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Monsoon : केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं हे कसं ठरवलं जातं? भारतीय हवामान विभागाचे निकष कोणते, जाणून घ्या?