पुणे : संपूर्ण महाराष्टाला प्रतीक्षा असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने राज्यात वर्दी दिली असली तरी शेतकरी वर्ग मात्र मोसमी पावसाची वाट बघत बसला आहे. त्यामुळे दुष्काळानं होरपळलेल्या महाराष्ट्राला ताटकळत ठेवणारा मान्सून आता अखेर 21 जूनला कोकणात दाखल होणार आहे. तर 24 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र दाखल होईल.  याबाबतची माहिती माहिती हवामान खात्यानं दिली आहे.


आधीच लांबलेल्या मान्सूनच्या प्रवासात ‘वायू’ वादळानं खोडा घातला होता. त्यामुळे पावसाने मोठी दडी मारली आहे. मान्सून लांबणीवर गेल्यामुळे राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.  मात्र अरबी आणि बंगालच्या उपसागरातले मान्सूनचे वारे सशक्त होऊन 24 तारखेपर्यंत महाराष्ट्रात वरुणराजा बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे

VIDEO | बुलडाणा जिल्ह्यात पाण्यासाठी जिवाचा जुगार | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



राज्याने यंदा उन्हाळ्याचे तीव्र चटके सहन केले आहेत. विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या काही भागात अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. बहुतांश ठिकाणी दुष्काळी स्थिती आहे. राज्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस कोसळत असला, तरी शेतकरी दुष्काळी स्थिती दूर होण्यासाठी मोसमी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. सद्य:स्थितीला चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. पुढील काही दिवसांत ते ओसरणार आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्यांच्या पुढच्या प्रवासासाठी वाट मोकळी झाली आहे.

यंदा मान्सून खूपच लांबला आहे. अजूनही मान्सून केरळमध्ये पोहोचलेला नाही. परंतु मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे, हे कसे समजते? मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे निकष कोणते? असे प्रश्न अनेकांना पडतात. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे, हे ठरवण्यासाठी तीन प्रमुख निकष आहेत.

Hingoli | अपुऱ्या पावसाच्या भरवशावर पेरणीला सुरुवात, दुबार पेरणीचं संकट | हिंगोली | ABP Majha



निकष पहिला 

पाऊस (RAINFALL)–भारतीय हवामान विभागाची केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर 14 केंद्र आहेत, त्यातल्या 60 टक्के म्हणजे 8 ते 9 केंद्रावर सलग दोन दिवस किंवा दोन दिवसांपेक्षा जास्त वेळ 2.5 मिलिमीटर किंवा त्याहून अधिक पावसाची नोंद झाली तर मान्सूनची वर्दी समजली जाते, दुसऱ्या दिवशी हवामान विभाग मान्सून भारतभूमीवर आला अशी घोषणा करतं, मात्र त्यासाठी आणखी दोन निकष पाहिले जातात.

निकष दुसरा

वाऱ्याचं क्षेत्र (WIND FIELD)–पश्चिमी वारे ठराविक वेगाने (ताशी 25 ते 35 किलोमीटर) आणि ठराविक दाबाने (600 हेक्टोपास्कल) वाहत असेल तर मान्सूनच्या आगमनाला पुष्टी मिळते.

निकष तिसरा

बहिर्गामी दीर्घतरंग प्रारण अर्थात Outgoing Longwave Radiation (OLR)– थोडक्यात उपग्रहांच्या आधारे त्या ठिकाणी ठराविक उर्जा आणि उष्णता आहे हे समजणे महत्त्वाचे आहे.

Water Scarcity | संपूर्ण महाराष्ट्रावर पाणीसंकट, धरणांत 7.7 टक्के पाणीसाठा | ABP Majha