वाशिम : जिल्ह्यातील महागाव कारंजा रोडवर शेत शिवार परिसरात रस्ता ओलांडताना चाकी वाहनाने एका माकडाला धडक दिली. धडक देऊन ते वाहन सुसाट निघून गेले. त्याचवेळी अपघातग्रस्त माकडासोबत असलेले त्याचे सहकारी मदतीसाठी एकवटले. सर्व सहकारी आपल्या मित्राला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु, त्या माकडाने जीव सोडला आणि इतर माकडांनी रस्ता जॅम करून ठेवला. घडलेला हा संपूर्ण प्रकार हृदय हेलावणाराच होता. त्यांचं दुःख आणि आक्रोश त्या मुक्या जनावरांच्या शरीर हालचालीद्वारे स्पष्ट दिसत होता.
मानवाचे पूर्वज म्हणून माकडांना ओळखले जाते. काळाच्या ओघात मानवजातीने मोठी प्रगती केली. माणूस अख्या निसर्गाला स्वतःची जहागीरी समजून बसला. स्वत:च्या विकासात पर्यावरणाचा ऱ्हास करत राहिला. त्यावर दुसऱ्या कोणाचा हक्क आहे हे त्याला कळलंच नाही. स्वतःच्या सुखसोयींसाठी, विकासाच्या नावाखाली जंगल तोडून प्राण्यांचा निवारा हिसकावून घेतला.
निसर्गाची वाट लावण्यात आज तो कुठेही मागे नाही
माणसाने केलेल्या निसर्गाच्या हानीमुळे दररोजच असे अनेक प्राणी जीव गमावत आहेत. मात्र त्याचं मानवाला काही देणं-घेणं नाही. आतापर्यंत झालं ते खूप झालं आता तरी मानवाने निसर्गाच्या या जीव सृष्टीकडे आत्मीयतेने बघितलं नाही तर या माकडाच्या मृत्यू प्रमाणे मानव जाती नष्ट होण्यास वेळ लागणार नाही, अशा भावना प्रणी प्रेमींतून व्यक्त होत आहे.
व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अपघात करून निघून गेलेल्या त्या चारचाकी वाहनाचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्राणी प्रेमिंमधून होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या फेसबूक, ट्वीटरसह व्हट्सअॅप स्टेटसला ठेवला आहे.
Monkey Protest : वाशिममध्ये माकडाचा अपघाती मृत्यू , आक्रमक झालेल्या माकडांनी केला रास्ता रोको, पाहा व्हिडिओ
महत्वाच्या बातम्या