पुणे शहरातील कॅम्प परिसरात शाहू जलतरण तलावावर एक माकड गेल्या काही दिवसांपासून दररोज पोहण्यासाठी येत आहे.
वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असून या तळपत्या उन्हात थंडावा मिळवण्यासाठी हे माकड या ठिकाणी दररोज न चुकता येतं. हे माकड काही वेळ पोहून परत झाडावर जाऊन बसतं.
माकडाच्या या लीला पाहण्यासाठी या जलतरण तलावावर माणसांची मात्र गर्दी होत आहे.
पाहा व्हिडीओ :