मुंबई: मशिदीवरील भोंग्याला हात लावाल तर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेनं भाजप आणि मनसेला दिला आहे. पण या पीएफआय संघटनेचा इतिहास जरा वादग्रस्त आहे. राजकीय हत्या आणि लव्ह जिहादमध्ये पीएफआयचं नाव आहे. तर कर्नाटकाती हिजाब प्रकरणी वातावरण तापवण्याचं काम या संघटनेनं केल्याचं सांगण्यात येतंय. 


पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेचा इतिहास काय आहे? 


पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेला पीएफआय या नावानेही ओळखलं जातं. पीएफआय (PFI) या संघटनेची ओळख ही एक कट्टर इस्लामिक संघटना अशी देखील आहे. या संघटनेची स्थापना 22 नोव्हेंबर 2006  रोजी झाली. ओएमए सलाम पीएफआय या संघटनेचे अध्यक्ष आहेत.


दिल्लीच्या शाहीन बागेत या संघटनेचं मुख्य कार्यालय आहे. या संघटनेचं ब्रीद वाक्य ‘नया कारवां, नया हिंदुस्थान’ असं आहे. सर्वांना स्वातंत्र्य, न्याय आणि सुरक्षितता मिळवून देणारा नवा समतावादी ईगॅलिटारियन समाज निर्माण करण्याचं ध्येय पीएफआयचं आहे. या संघटनेमार्फत मिश्रा कमिशनच्या अहवालाचा वापर करून मुस्लिमांना समता तसेच राखीव जागा यांचा प्रसार केला जातो. देशातल्या 23 राज्यांमध्ये ही संघटना सक्रिय आहे. 


पीएफआयवर उत्तर भारतात विविध आरोप देखील करण्यात आले आहेत. देशात घडलेल्या वेगवेगळ्या प्रकरणात पीएफआय संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पीएफआय आणि वाद कोणकोणते आहेत त्यावर देखील नजर टाकुयात


या संघटनेचा संबंध इस्लामिक दहशतवादाशी असल्याचा दावा आउटलूकने केला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणा या संघटनेचे आयएसआयएस आणि सिमीशी असलेले संबंध शोधत आहे. पीएफआयचे केरळ मॉड्यूल ISIS साठी काम करत असल्याचे सांगितले जाते. तेथून त्याचे सदस्य सीरिया आणि इराकमध्ये इसिसमध्ये सामील झाले असं म्हटलं जातं. मे 2019 मध्ये भारतीय गुप्तचर संस्थांनी PFI च्या अनेक कार्यालयांवर छापे टाकले होते. राजकीय हत्या आणि लव्ह जिहादमध्ये पीएफआयचं नाव आहे.  पीएफआयवर देशातल्या अनेक दंगलींचा आरोप आहे. तसेच सीएए, एनआरसी विरोधातील आंदोलनात या संघटनेचा सक्रीय सहभाग होता.


मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, झारखंड, प. बंगालसह विविध भागात रामनवमी मिरवणुकांवरील हल्ल्यांमागे पीएफआय असल्याचा संशय केंद्रीय तपास यंत्रणांना आहे. केंद्रीय स्तरावर सदर संघटनेवर बंदी घालण्याचा विचार सुरु आहे. 


संबंधित बातम्या: