Raj Thackeray In Pune: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यातून पक्ष नोंदणीच्या मोहीमेला सुरुवात केली आहे. नोंदणीचा पुण्यात पहिला अर्ज भरत त्यांनी नोंदणी मोहीमेला सुरुवात केली आहे. मनसेच्या पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयात या मोहीमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी पुण्यातील मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जास्तीत जास्त तरुणांनी आपली नोंदणी करुन घ्यावी आणि पक्षात सहभागी व्हावं, असं आवाहन देखील केलं आहे.
राज ठाकरे त्यांच्या भाषणाच्या उपहासात्मक आणि वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे. त्याच शैलीची प्रचीती पुण्यात देखील आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मला त्यांच्या पक्षाचं सदस्य करुन घेतलं त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे, असं म्हणत त्यांनी स्वत:च्याच पक्षाचे आभार मानले. यावेळी सभागृहात हशा पिकला होता.
अनेक तरुणांनी मनसेची नोंदणी करा, असं आवाहन करत त्यांनी तरुणांना साद घातली आहे. नोंदणी केल्यावर प्रत्येक महिन्यात नोंदणीकृत व्यक्तीच्या मोबाईलवर एक मेसेज येईल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र हा मेसेज नेमका कशासाठी येणार? किंवा त्या मेसेजमध्ये नोंदणी केलेल्या सदस्यांना काय मिळाणार? या बाबी त्यांनी सध्या गुलदस्त्यात ठेवल्या आहेत. आजपर्यंतची नोंदणी प्रत्येकवेळी मुंबईत झाली मात्र यावेळी मी नोंदणीची सुरुवात पुण्यापासून करण्याचं निश्चित केलं होतं. निवडणूक आयोगानुसार काही वर्षांनी नोंदणी पुन्हा करावी लागते. 2019 मध्ये ही नोंदणी झाली होती. मात्र कोरोनानंतर आजपासून या नोंदणीला सुरुवात होत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
शस्त्रक्रिया आणि विश्रांती अशा दोन महिन्याच्या कालावधीनंतर राज ठाकरे अँक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी सध्या पुण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचं चित्र आहे. पुण्यात यंदा महापालिकेच्या निवडणूका आहेत. त्यासाठी सगळ्या पक्षांकडून मोठे प्रयत्न सुरु आहे. याच स्पर्धेत टिकण्यासाठी ते सातत्याने पुणे दौरा करत असल्याच्या चर्चा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत सुरु होणाऱ्या सदस्य नोंदणीसाठी यंदा पुणे शहर निवडलं आहे. त्यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्रचा सेवक'
आगामी निवडणुकीपु्र्वी राज्यभर मनसेची सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. त्यासाठी नव्या घोषवाक्याचीही घोषणा करण्यात आली आहे. मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्रचा सेवक असं म्हणत त्यांनी या घोषवाक्यात मराठी अस्मितेसह हिन्दूत्वाचा मुद्दा जोडला आहे. यंदा अमित ठाकरे देखील पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. अनेक तरुणांशी विद्यार्थ्यांशी संपर्कसाधत त्यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Raj Thackeray Speech : एकमेकांची उणी दुणी सोशल मीडियावर काढायची असेल तर काढून बघा... : राज ठाकरे