Akola Amol Mitkari vs MNS : आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना माझं ओपन चॅलेज आहे. पोलिस सुरक्षा बाजूला कर, मी समोर येतो अन् एकदा काय ते होऊनच जाऊ दे, असा थेट आव्हान मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे (Karnabala Dunbale) अमोल मिटकारींना दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) केलेल्या एका वक्तव्याने राज्याचा राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला आहे.
यात संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यात (Akola News) राडा घालत अमोल मिटकरी चक्क गाडी फोडल्याची घटना घडलीय. मिटकरींच्या गाडी तोडफोड आणि राडा प्रकरणात आता पर्यंत 13 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर यातील तिसरा संशयित आरोपीलाही आता ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान आता मनसे सरचिटणीसांचे अमोल मिटकरींना थेट आव्हान दिल्याने आता मनसे विरुद्ध राष्ट्रवादीतील हा वाद टोकाला गेल्याचा दिसून येतंय.
मिटकरी हे अजित दादांना बुडवल्या शिवाय राहणार नाही- कर्णबाळा दुनबळे
आमदार अमोल मिटकरी हे कोणाबद्दल कधी चांगलं बोलले आहे का? ज्या सुप्रीया ताईंनी त्यांना पक्षात स्थान दिलं, त्यांना यांनी सोडलं नाही. हा माणूस अजित दादांना बुडवल्या शिवाय राहणार नाही. मी उद्या अकोल्यात जातोय. पोलिसांना सर्व सहकार्य करणार. मात्र, राज साहेबांबाबत एकही चुकीची गोष्ट एकूण घेणार नाही. गरज पडल्यास अमोल मिटकरींना जशास तसं उत्तर दिलं जाणार, अशी प्रतिक्रियाही मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी दिली.
मनसे कार्यकर्त्यांच्या राड्यात एका कार्यकर्त्याचा दुदैवी मृत्यू
दरम्यान, काल मिटकरी यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीवरील तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यावेळी अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या राड्यात जय मालोकार हा देखील सहभागी होता. राड्यानंतर मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राड्यात झालेल्या झटापटीनंतर जय मालोकार यांच्या छातीत दुखत असल्याने उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यात जय मालोकार यांचा मृत्यू झालाय. दरम्यान, जय मालोकार या मनसे कार्यकर्त्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
जिल्ह्यातील निंबी मालोकार या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहे. याआधी जयचा मृतदेह अकोल्यातील मोठी उमरी भागातील विठ्ठल नगरातील निवासस्थानी नेण्यात आला होता. यावेळी निंबीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अंत्यसंस्काराला मनसेचे अनेक मोठे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
कोण आहे मरण पावलेला मृत मनसे कार्यकर्ता?
- जय मालोकार मनसेच्या विद्यार्थी आघाडीचा अकोला जिल्हा उपाध्यक्ष.
- सध्या परभणी येथे होमिओपॅथी मेडिकल शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षाला.
- अकोल्यातील उमरी भागात वास्तव्यास.
- गेल्या पाच वर्षांपासून मनसेमध्ये सक्रियपणे कार्यरत.
हे ही वाचा