Ramdas Athawale on Raj Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांची कॉपी राज ठाकरे कधी करु शकत नाहीत. बाळासाहेब ठाकरे हे वेगळं नेतृत्व होतं. त्यांनी भोंगे काढा असे कधी म्हटलं नसल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. बाळासाहेब ठाकरे हे मुस्लिम विरोधी नव्हते, त्यांचा मुस्लिम समाजाला पाठिंबा होता. आंतकवादी मुस्लिमांच्या विरोधात ते होते असेही आठवले यावेळी म्हणाले.
दरम्यान, सगळ्या मुस्लिमांना त्रास देण्याची बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका नव्हती. त्यामुळे राज ठाकरे बाळासाहेबांची कॉपी करु शकत नाहीत असे माझे मत असल्याचे आठवले म्हणाले. बाळासाहेबांची कॉपी करणे एवढं सोप काम नाही. मी मनसे सांगतो की आम्हाला मनसेची अवशक्यता नाही. नरेंद्र मोदी यांची स्वतःची प्रतिमा आहे. चुकीच्या भूमिका मांडणाऱ्या लोकांची आवश्यकता नाही. भाजप त्यांना घेणार देखील नाही, भाजप स्वतः सक्षम असल्याचे आठवले म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज भीमा कोरेगाव प्रकरणी आपली साक्ष नोंदवणार आहेत. भीमा कोरेगावमध्ये घडलेल्या हिंसचाराची चौकशी करणाऱ्या जे. एन. पटेल आयोगासमोर शरद पवार पवार साक्ष देणार आहेत. यावरुन आठवले यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, शरद पवार हे आज हजर राहणार असतील तर ते त्या संदर्भात त्यांची बाजू मांडतील. मात्र, आमचं म्हणणं आहे की भीमा कोरेगाव दंगल ही जाणीवपूर्वक घडवली गेली. त्या दंगलीचा आणि एल्गार परिषदेचा काहीही संबंध नाही. संभाजी भिडे यांना क्लिन चीट मिळाली असेल. कारण त्यांच्याविरोधात पुरावे नसतील. संभाजी भिडेंवर कारवाई व्हावी हीच आमची भूमिका आहे, आयोगाला त्या संदर्भात पत्र लिहू असेही आठवले यावेळी म्हणाले.
भोंगे काढण्याची भूमिका ही असंवैधानिक आहे. मस्जिदवर आहेत भोंगे, तुम्ही का करताय सोंगे असे म्हणत रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला. मस्जिदवरील भोंग्याचा आवाज कमी करता येऊ शकतो, मात्र काढून टाका म्हणणे चुकीचे आहे. नवरात्रीला देखील आवाज असतो, बुद्ध पौर्णिमा देखील उत्साहात साजरी होते, पण मुस्लिमांनी कधी विरोध केला नसल्याचे आठवले यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: