Ramdas Athawale : भोंगे काढण्याची भूमिका ही असंवैधानिक आहे. मस्जिदवर आहेत भोंगे, तुम्ही का करताय सोंगे असे म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला. मस्जिदवरील भोंग्याचा आवाज कमी करता येऊ शकतो, मात्र काढून टाका म्हणणे चुकीचे आहे. नवरात्रीला देखील आवाज असतो, बुद्ध पौर्णिमा देखील उत्साहात साजरी होते, पण मुस्लिमांनी कधी विरोध केला नसल्याचे आठवले यावेळी म्हणाले.


बळजबरीने जर भोंगे काढले जात असतील तर सुरक्षा देऊ अशी आमची भूमिका असल्याचे आठवले म्हणाले. सोलापुरातील लोकांनी निवेदन दिले आहे. पोलीस दबाव आणून भोंगे काढायला सांगात असल्याचे आठवले म्हणाले.


आरक्षण प्रश्न सोडवता येत नसेल तर सत्ता सोडावी


ओबीसींना स्थानिक संस्थामध्ये आरक्षण मिळत होते. मात्र, सर्वोच न्यायालयाने आरक्षण नाकारले. मात्र, याचा पुन्हा एकदा विचार झाला पाहिजे असे आठवले म्हणाले. महाराष्ट्र सरकारने योग्य पद्धतीने बाजू न मांडल्याने हे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप आठवले यांनी केला. मराठा समजावर देखील अन्याय झाला आहे. राज्य सरकारने योग्य पद्धतीने भूमिका मांडली नाही. जर आरक्षण प्रश्न सोडवता येत नसेल तर सत्ता सोडावी. प्रत्येक प्रश्नाबाबत केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. पाच राज्याची निवडणूक ही 2024 ची रिअर्सल होती असेही आठवले यावेळी म्हणाले.


2024 ला एनडीए 400 पुढे जाईल


2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 350 आणि एनडीए 400 पुढे जाईल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. राज्यात सरकार पडले तर आम्ही पर्यायी सरकार देऊ. सध्या काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे, त्यांची काम होतं नाहीत. त्यामुळे त्यांनी पाठिंबा काढून घ्यावा. जर सरकार पडले नाही तर पुढच्या निवडणुकीत तर आम्ही सत्तेवर येऊ असेही आठवले म्हणाले. सरकार पडावं अशी आमची इच्छा आहे, पण सरकार पडत नाही. नवनीत आणि रवी राणा यांची भूमिका हिंसेची नव्हती. मात्र, राज्य सरकारने राजद्रोहचा गुन्हा दाखल केला, कायद्याचा गैरवापर सरकारने केल्याचे आठवले म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: