Gulabrao Patil : राज ठाकरेंनी (Raj Thackeray) खरे भगवे विचार जिथं आहेत तिथं जावं, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. त्यांनी संजय राऊत या भूताच्या नादी लागू नये असा सल्लाही पाटील यांनी दिला. राज ठाकरेंना राऊत आतापर्यंत कायकाय बोलले. राऊत खोडारडा माणूस आहे. बाळासाहेब ही संजय राऊतांच्या बापाची प्रॉपर्टी नाही असेही पाटील म्हणाले.
हिंदुत्वाचे विचार सोडल्याने पक्षाला गळती
शिवसेनेचा वर्धापन दिन हा या पक्षातील मागे केलेली कामं आणि राहिलेल्या उनिवा यासाठी असतो. पुढच्या वर्षभरात आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी असतो. संजय राऊतांना फार किंमत देत नाही. ज्यांनी हिंदुत्व सोडलं ज्यांनी उद्धवजींना फसवलं असेही पाटील म्हणाले. आम्ही केलेला उठाव, विधानसभेत आम्हाला मिळालेलं यश, यावरुन आम्ही भगवा तेवत ठेवला आहे असे पाटील म्हणाले. पहिलं भाषणाची सुरूवात हिंदु बंधु बघिंनींनो अशी व्हायची आता देशभक्त म्हणायला लागले आहेत. लोकसभेला आम्हाला यश मिळालं नाही विधानसभेला खबरदारी घेतल्याचे पाटील म्हणाले. हिंदुत्वाचे विचार सोडल्याने पक्षाला गळती लागल्याचे टीका पाटील यांनी केल.
बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून उद्धव ठाकरेंचा आदर
संजय राऊत हा आमच्या जीवावर खासदार झाला आहे. इडा पिडा जाऊ दे राऊत सारखा भूत जाऊ दे यासाठी गोगावलेंनी पुजा केली आहे, उद्धवसाहेबांना सुबुद्दी येऊ देत असेही गुलाबराव पाटील म्हणाले. संजय राऊत हा कोणाला पुढे जाऊ देणार नाही. राहिलेली शिवसेना कोण बुडवणार तर संजय राऊत असेही पाटील म्हणाले. बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून उद्धव ठाकरेंचा आदर असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले.
शिवसेनेला 59 वर्ष पूर्ण
मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी आणि मराठी माणसाला स्वाभिमानानं जगण्यासाठी हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेना या संघटनेची स्थापना केली. आज शिवसेना या संघटनेला 59 वर्ष पूर्ण होतायेत. या 59 वर्षांत शिवसेनेनं अनेक संकटं, अनेक वादळी वारे झेलले. तसंच अनेक मोठ्या दिग्गजांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून दुसरा मार्ग स्वीकारला. या 59 वर्षांत बरंच पुलाखालून पाणी गेलंय. परंतु जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं. ते ऐतिहासिक आणि शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड होतं. त्यामुळं सध्या शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिवसेनेचा वर्धापन दिन एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या गटांकडून साजरा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या: