Gulabrao Patil : आम्ही गद्दारी केली अशी आमच्यावर टीका होते. मात्र, गद्दारी का केली याची कबुली मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी दिली आहे. मराठा चेहऱ्याला मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही गद्दारी केल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. एकनाथ शिंदेसारखा (Eknath Shinde) चेहरा शिवसेनतून बाहेर जात होता म्हणून गद्दारी केल्याचे पाटील म्हणाले. एकनाथ शिंदेसाठी मी त्याग केल्याचे गुलबाराव पाटील म्हणाले. 


उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बोललो होतो की, एकनाथ शिंदे यांच्यासारखा मराठा चेहरा, आपल्यापासून लांब जाता कामा नये. आपण त्यांना बोलवले पाहिजे. मात्र, यादरम्यान आम्ही उठाव केला आणि मराठा चेहरऱ्याच्या मागे उभे राहिल्याचे पाटील म्हणाले. ते जळगावमध्ये बोलत होते. गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंच्या बाजुला बसतो यावरच तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरही जोरदार टीका केली.  


अजित पवारांच्या टिकेला गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर 


जे सकाळी एका सोबत शपथ घेतात, दुपारी दुसऱ्यासोबत जातात आणि संध्याकाळी तिसऱ्यासोबत सरकार बनवतात त्यांनी आम्हाला सांगण्याची गरज नसल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केली. अजित पवार यांनी पुण्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील आमदारांवर टीका केली होती. उध्दव ठाकरे यांना सोडून शिवसेनेतून बाहेर पडलेला एकही आमदार पुन्हा निवडून येणार नाही, अशी टीका अजित पवार यांनी पुण्यात केली होती. या टिकेला गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये बोलताना प्रत्युत्तर दिलं.


जनता हुशार, अजित पवारांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही


अजित पवार यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. जनता हुशार असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. जे सकाळी कुणाबरोबरच शपथ घेतात आणि संध्याकाळी कुणासोबत जातात आणि तिसऱ्या दिवशी कोणासोबत सरकारमध्ये बसतात, त्यांनी या गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही असे गुलाबराव पाटील म्हणाले.
गद्दारी केली अशी आमच्यावर टीका होते. मात्र, गद्दारी का केली अशी कबुली मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. उध्दव ठाकरे यांना बोललो होतो की,  एकनाथ शिंदे यांच्यासारखा मराठा चेहरा, आपल्यापासून लांब जाता कामा नये. आपण त्यांना बोलवले पाहिजे. मात्र, यादरम्यान आम्ही उठाव केला आम्ही मराठा चेहऱ्याच्या मागे उभे राहिलो. हे स्वार्थपणे आणि बिनधास्तपणे सांगतोय, असंही मंत्री गुलाबराव पाटील यांनी  सांगितलं. 


पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या रोड शोमध्ये गद्दार-गद्दार अशी घोषणाबाजी


पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शोमध्ये गद्दार गद्दार अशी घोषणाबाजी झाली होती. यावर प्रतिक्रिया देतांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. दहा वीस टिपुकले लोकं आहेत, ते बोंबलत असतात. जनतेची कामे करा, काम करणाऱ्यांच्या मागे जनता आहे, हा कायमचा अनुभव असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. त्यामुळं पुणे कसबा निवडणुकीत विजय आमचाच होईल, असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. 


महत्त्वाच्या बातम्या:


Sanjay Raut: सत्तांतरावेळी उद्धव ठाकरे फडणवीसांशी बोलले असतील, मात्र फडणवीसांना सनसनाटी निर्माण करायची सवय : संजय राऊत