Sanjay Raut on Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सनसनाटी निर्माण करायची सवय लागली आहे. त्यांना स्टंट आणि सनसनाटी निर्माण करण्याचा छंद का लागला हे माहित नसल्याचे वक्तव्य शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. पूर्वीचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यात फरक आहे. फडणवीस हे सध्या उपमुख्यमंत्री आहेत, किती काळ राहतील हे सांगता येत नाही. दिल्लीची मर्जी असा टोलाही राऊतांनी फडणवीसांना लगावला. ते आज सकाळी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.


महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतर घडताना उद्धव ठाकरे फडणवीसांशी बोलले असतील


ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली होती, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मला फोन करुन मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय. यावर संजय राऊतांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता, राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करायची सवय लागली आहे. महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतर घडत असताना फडणवीस विरोधी पक्षनेते होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. असा स्थितीत उद्धव ठाकरे फडणवीसांशी बोलले असतील. मात्र, इतक्या दिवसांनी सनसनाटी निर्माण करुन फडणवीस काय सांगू इच्छितात? असा सवाल संजय राऊतांनी केलाय.   


राज्यात अनेक काळापासून निवडणुकीत पोलिसांच्या मदतीनं पैशांचं वाटप 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना मुख्यमंत्री पदाचीच ऑफर दिली होती ना. आज तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. किती काळ उपमुख्यमंत्री राहाल हे सांगता येत नसल्याचे राऊत म्हणाले. कसबा निवडणुकीत भाजपने पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. यावर देखील राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात अनेक काळापासून निवडणुकीत पोलिसांच्या मदतीनं पैसे वाटप केले जात आहेत. मागच्या निवडणुकीत सुद्धा पोलिसांच्या मदतीनं पैसे वाटल्याचे पुराव्यानिशी समोर आल्याचे राऊत म्हणाले. पोलिस राजकीय एजंट बनून पैसे वाटत असल्याचे राऊत म्हणाले. धंगेकरांनी आरोप केले असतील तर त्यांच्याकडे याचे पुरावे असतील असेही राऊत म्हणाले. 


सरकारच्या मनात भय, त्यांनी निवडणुका घ्यालया हव्यात


सरकारनं निवडणुका घ्यायला हव्यात. त्यांच्या मनात भय आहे. निवडणुकीला सामोर न जाणं हे लोकशाहीचं लक्षण नसल्याचे राऊत म्हणाले. आमदार खासदारांना पैसे देऊन विकत घेताना जी निर्भयता दाखवली तिच निर्भयता निवडणुका घेण्यासाठी हे सरकार का दाखवत नाही? असा सवालही राऊतांनी केला. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik Sanjay Raut : साडेतीनशे वर्षांपूर्वी दिल्लीतून संकट आलं होत, पुन्हा महाराष्ट्रावर तेच संकट आलंय, संजय राऊतांचा इशारा