Bharat Gogavale on Maratha reservation : मनोज जरांगे पाटील हे स्वतंत्र विचारांचे आहेत. ते समाजासाठी झटत आहेत. त्यामध्ये त्यांचा वौयक्तिक स्वार्थ नसल्याचे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी केलं आहे. मनोज जरांगे यांनी मांडलेल्या मागण्या योग्य आणि रास्त आहेत. त्यामुळं आमच्या महायुतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकू नये, असा सल्लाही गोगावले यांनी विरोधकांना दिला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जर का कोणी चुकीचा विचार करत असेल तर ते होणार नाही असेही ते म्हणाले.
राज ठाकरेंच्या वक्तव्यावर भरत गोगावलेंचा पलटवार
मराठा आरक्षणासाठी मागील दोन दिवसांपासून मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी एकनाथ शिंदेंकडे जाऊन याबद्दल विचारा असे विधान केलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी राज ठाकरे हे कोणत्या भावनेने बोललेत ते आपल्याला सांगता येणार नाही असा टोला लगावलाय. मात्र मनोज जरांगे पाटील हे स्वतंत्र विचाराचे आहेत ते समाजासाठी फक्त झटत आहेत. त्यामध्ये त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नाही. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जर का कोणी चुकीचा विचार करत असेल तर ते होणार नाही. जरांगे यांनी मांडलेल्या मागण्या ही योग्य आणि रास्त आहेत. त्यामुळं आमच्या महायुतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकू नये असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.
आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानातील आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आपला निर्धार कायम ठेवला आहे. सरसकट मराठे कुणबी असल्याचा जीआर निघाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचा त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. पहिल्या दिवशी सरकारकडून कोणत्याही प्रकारे मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क करण्यात आला नव्हता. त्याचबरोबर आझाद मैदानात झालेल्या गैरसोयीवरूनही बरीच सडकून टीका झाल्यानंतर आज सकाळी बीएमसी प्रशासनाकडून आझाद मैदान परिसरामध्ये तातडीने सोयी सुविधा पुरविण्यात आल्या. त्यानंतर दुपारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री न जाता शिंदे समितीला मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी आझाद मैदानात पाठवण्यात आलं. यावेळी समितीकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्याचा आढावा घेत सरकार कोणकोणत्या बाबींवर काम करत आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न केला.
महत्वाच्या बातम्या:
मराठा आंदोलकांची मागणी मान्य, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून मुदतवाढ मिळाली