Gunaratna Sadavarte on Manoj jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु आहे. लाखो मराठा कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणावर अॅड गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी टीका केलीय. जरांगे यांचे जे मसिआ आहेत, त्यांना कधीही गणेशभक्त माफ करणार नाहीत. स्टेजवर जरांगे अर्वच्च भाषेत बोलतात. काल स्टेजवर जरांगेंनी धनगर समाजाबद्दल अपशब्द वापरला. आरक्षणाच्या नावे धनगर समाजाच्या गाXX बांबू घातला असेतो म्हणाला. एका समाजाचा अपमान करण्याचा अधिकार त्याला आहे का? असा सवाल सदावर्ते यांनी केला. राज्यातील सर्व मराठा पुढारी गेमिंग करत आहेत का? मराठी नसलेला मुख्यमंत्री असला की मग चुळबूळ चुळबूळ करत आहेत. जरांगेंची भाषा ही गावगड्याची भाषा नाही तर माजुरडी भाषा असल्याची टीका सदावर्ते यांनी केली.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार मनोज जरांगेंचे लाड करतायेत
न्यायमूर्ती शिंदे यांच्यासमोर जरांगे मनाले की हे सरकार चाबरं आहे. उद्धव ठाकरे शरद पवार तुम्ही ऐकताय आणि त्याचा लाड तुम्ही करताय? हा सगळ्यांचा अपमान करतो सरकारचा अपमान करतो. तुम्हाला याचा कळवळा असल्याचे सदावर्ते म्हणाले. महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे. आज सहा वाजता आंदोलन संपल्यानंतर जरांगेचे लाड बंद करा. त्याला उचला आणि अटक करा. राज्य कायद्याचं आहे, कायद्यापेक्षा जरांगे मोठा नाही. त्याला अटक करुन कोर्टासमोर हजर करा असे सदावर्ते म्हणाले. मुंबई महापालिकेने सेल्फी पॉइंट इथे केलेल्या पॉंड्च्या पाण्यामध्ये तुम्ही नाचता तुम्ही मराठा बांधव नाहीत, तर तुम्ही स्पॉन्सर्ड कार्यकर्ते आहात असा टोला देखील सदावर्ते यांनी लगावला.
जरांगेचं आंदोलन आटोपतं घेऊन त्याला त्याच्या गावी धाडावे
न्यायमूर्ती संदीप शिंदे हे मनोज जरांगे यांच्यासमोर हाताश दिसत होते. जरांगे म्हणत होता की मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण द्या, मात्र ते त्यावर काहीच बोलत नव्हते. त्यांनी कोर्टात असल्याप्रमाणे सांगायला हवं होतं असे सदावर्ते म्हणाले. जरांगेचं आंदोलन आटोपतं घेऊन त्याला त्याच्या गावी धाडावे असेही सदावर्ते म्हणाले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून मुंबईच्या आझाद मौदानावर आमरण उपोषण सुरु केलं आहे. आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
महत्वाच्या बातम्या: