सोलापूर : सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडेकनूर यांची हत्या केल्याची कबुली एमआयएम नगरसेवक तौफिक शेख याने पोलिसांसमोर दिली आहे. आर्थिक वाद आणि जागेच्या व्यवहारावरुन रेश्मा यांचा जीव घेतल्याचं तौफिक शेखने मान्य केल्याचं पोलिस अधीक्षक अमृत निकम यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.


कर्नाटक पोलिसांनी सोलापूर शहरातून तौफिक शेखला अटक केली होती. तौफिक शेखवर याआधी 31 विविध गुन्हे दाखल आहेत. MPDA अंतर्गत त्याच्यावर तडीपाराची कारवाई झाली होती, असंही पोलिसांनी सांगितलं.

रेश्मा पडेकनूर यांनी 17 एप्रिल रोजी तौफिक शेख विरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बेपत्ता असेलल्या रेश्मा यांचा मृतदेह 16 मे रोजी विजयपूरमध्ये सापडला होता.



रेश्मा पडेकनूर आणि तौफिक शेख यांच्यामध्ये मागील काही वर्षांपासून वाद सुरु होता. त्यामुळे रेश्मा यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे पती बंदेनवाज पडेकनूर यांनी तौफिक शेख विरुद्ध फिर्याद दिली होती. त्यानंतर फरार झालेल्या तौफिकचा शोध पोलिस घेत होते.

तौफिक शेखने रेश्मा यांच्याकडून 13 लाख रुपये घेतले होते, पैसे परत करण्याच्या बहाण्याने रेश्मा यांना घरातून बाहेर नेऊन त्यांची हत्या केल्याचा आरोप रेश्मा यांचे पती बंदेनवाज पडनेकूर यांनी केला होता.