सोलापूर : सोलापुरातील एमआयएमचा नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेखला पोलिसांना अटक केली आहे. विजयपूर येथील काँग्रेसच्या पदाधिकारी रेश्मा पडेकनुर यांच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता.


कर्नाटक पोलिसांनी सोलापूर शहरातून तौफिक शेख याला अटक केली. सोमवारी सकाळी विजयपूर न्यायालयात तौफिक शेख याला हजर करण्यात येणार आहे. हत्येच्या आरोपानंतर तो फरार होता. रेश्मा पडेकनुर यांनी 17 एप्रिल रोजी तौफिक शेख विरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रेश्मा यांची विजयपूर येथे हत्या करण्यात आली होती.


लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान रेश्मा यांनी नगरसेवक तौफिक शेख यांच्या विरुद्ध सोलापूर पोलिसात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्यांनतर रेश्मा चर्चेत आल्या होत्या. मात्र 17 मे रोजी विजयपूरजवळ असलेल्या कोलार गावात रेश्मा यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाल होती. रेश्मा यांचे पती बंदेनवाज पडेकनुर यांनी तौफिक शेख विरुद्ध फिर्याद दिली होती.


तौफिक शेखने रेश्मा यांच्याकडून 13 लाख रुपये घेतले होते, पैसे परत करण्याच्या बहाण्याने रेश्मा यांना घरातून बाहेर नेऊन त्यांची हत्या केल्याचा आरोप रेश्मा यांचे पती बंदेनवाज पडनेकूर यांनी पोलिसात केला आहे.