मुंबई : दूध का दूध और पानी का पानी.. हा डायलॉग तुम्ही हिंदी चित्रपटात अनेकवेळा ऐकला असेल. मात्र आता तुम्ही देखील दूध का दूध आणि पानी का पानी करु शकता. कारण दुधातली भेसळ ओळखणारी मिल्क स्ट्रिप लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.
दूध हा सर्वच वयोगटांसाठी आवश्यक आहार. मात्र नफेखोरीसाठी व्यापाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या भेसळीमुळं पांढरंशुभ्र दूध स्लो पॉयझन ठरतं. पण यापुढं तुम्हाला घरबसल्या दुधातली भेसळ ओळखता येणार आहे. आणि तीसुद्धा फक्त 50 ते 60 रुपयांमध्ये
दुधातली युरियाची भेसळ ओळखण्यासाठी लवकरच अशा मिल्क स्ट्रिप बाजारात उपलब्ध होणार आहेत. पुण्यातील शास्त्रज्ञ डॉ खंदारे यांनी दुधातील भेसळीचा पर्दाफाश करणाऱ्या मिल्क स्ट्रिपचा शोध लावला आहे.
या संशोधनाचं पेटन्ट रजिस्टर केल्यानंतर ही मिल्क स्ट्रीप सर्वसामान्यांच्या हातात पडेल. तसेच याच्या वापरासाठी खंदारे अन्न आणि पुरवठामंत्री गिरीश बापट यांचीही लवकरच भेट घेऊन, त्यांना याबाबत डेमो देणार आहेत.