Parbhani: परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Parbhani Zilla Parishad CEO) शिवानंद टाकसाळे (Shivanand Takasale) यांनी आरोग्य अधिकाऱ्याला नियुक्तीसाठी पैसे मागितले. मात्र, पैसे न दिल्याने या अधिकाऱ्याचा मानसिक छळ केला. त्यामुळं या आरोग्य अधिकाऱ्याने आपला राजीनामा थेट प्रधान सचिवांकडे पाठवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे..
भुसावळ येथून परभणीत बदली झालेले आरोग्य अधिकारी डॉ रविंद्र देशमुख यांना पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नियुक्त करण्यात आले. मात्र, नियुक्ती झाल्यानंतर शिवानंद टांकसाळे यांनी देशमुख यांना बोलवून तुम्हाला हवी तिथे नियुक्ती देतो मला दोन महिन्याचे मासिक वेतन आणि 10 हजार रुपये प्रति महिना द्या अशी मागणी केली. मात्र, देशमुख यांनी मी पैसे देत नाही आणि घेत ही नाही असे स्पष्ट सांगितल्यानंतर टांकसाळे यांनी डॉ देशमुख यांचा इतर अधिकाऱ्यांना हाताशी धरून मानसिक छळ सुरू केला आणि असंसदीय भाषा वापरने सुरू केले. ज्याला वैतागून आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र देशमुख यांनी आपला राजीनामाच थेट प्रधान सचिव यांच्यासह मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. तसेच शिवानंद टांकसाळे यांच्या भ्रष्ठ कारभाराची चोकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय.
बीडमधील भ्रष्टाचाराचा ही तक्रारीत केला उल्लेख
डॉक्टर रवींद्र देशमुख यांनी शिवानंद टाकसाळे यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक असतांना केलेल्या भ्रष्टाचारामुळे त्यांना विधिमंडळाने निलंबित केले होते, याचाही उल्लेख या तक्रारीत केल्यानं परभणी जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शिवानंद टाकसाळे यांचं स्पष्टीकरण
मी डॉ रवींद्र देशमुख हे कोण आहेत? त्यांना ओळखतही नाही पाहिलेले सुद्धा नाही. तर, पैश्याची मागणी कसा करेन? अशी स्पष्टोक्ती देत शिवानंद टांकसाळे यांनी दिलीय. तसेच डॉ रविंद्र देशमुख यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत लसीकरण अत्यंत कमी आहे आणि त्यामुळे त्यांना आम्ही कारणे दाखवा नोटीस बजावली. निलंबित होण्याच्या भीतीनं त्यांनी हे आरोप केले असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टांकसाळे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-