पंढरपूर : भोसे गावात दूध केंद्रावर मारलेल्या छाप्यात बंदी असलेले मेलामाईन सापडल्याने अन्न व औषध प्रशासनाला धक्का बसला आहे. या पदार्थाला भारतात बंदी असताना हे पंढरपूरपर्यंत कसे पोहचले याचा तपास पोलिस करत आहे. मेलामाईन हा पदार्थ वापरुन दुधात भेसळ केली जाते. या प्रकरणी कृत्रिम दूध आणि त्यासाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य जप्त केलं आहे.


पंढरपुरातील भोसे गावात दूधात भेसळ करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने या ठिकाणी छारा मारुन कारवाई केली. या दूध संकलन केंद्रात डॉ. जाधव दुधात भेसळ करत होते. देशात बंदी असलेले मेलामाइन, पॅराफीन सारखे विषारी द्रव्य दुधात टाकून भेसळ केली जात होती. 638 लिटर दूध ताब्यात घेऊन नष्ट करण्यात आलं आहे. अन्नात मेलामाइन भेसळीची पहिलीच घटना आमच्यासमोर आली आहे. यामध्ये मुंबईतील एक दलाल सहभागी असल्याची माहिती असून त्याचा शोध पोलिसांमार्फत घेतला जात आहे. आरोपी डॉक्टर जाधव हा सराईत गुन्हेगार असून याच्या आधी देखील त्याच्यावरती विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अशी होते दूध भेसळ
मेलामाईन पाण्यात टाकल्यावर पाण्याचा रंग दुधासारखा होतो. या पाण्याला दुधासारखी चव येण्यासाठी दूध पावडर व इतर पदार्थ मिसळले जातात. त्यानंतर चांगल्या 15 लिटर दुधात असे रसायनापासून तयार केलेले 40 लिटर मिश्रण टाकले जायचे. 15 लिटर दुधाचे 55 लिटर भेसळीचे दूध तयार करण्यात येते.

काय आहे मेलामाईन
मेलामाईन हे कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजनचा फॉर्म्युला आहे. या तिन्हींचे मिश्रण तयार केल्यावर साइनामाईड या विषारी द्रव्याप्रमाणे हे काम करते. दूधात पाणी मिसळले तर प्रत्येक लिटरमागे प्रथिनाची मात्रा कमी होते आणि दूध भेसळयुक्त आहे हे उघडकीस येते. प्रथिने मोजण्यासाठी दूधात नायट्रोजन किती आहे ते तपासले जाते. यासाठी अ‍ॅनालीटीकल केमेस्ट्रीची जेडाल्स मेथड वापरली जाते. मेलामाइन दूधात सहज मिसळते. जेडाल्स मेथड फक्त नायट्रोजन मोजत असल्याने मेलामाइनमुळे नायटोजनचे प्रमाण वाढवले गेले आहे हे उघडकीस येत नाही. त्याच कारणाने भेसळ करणारे मेलामाइन वापरतात.

Milk Adulteration | नामांकित दूध कंपन्यांच्या दुधात भेसळ, 237 लिटर दूध जप्त, दोघांना बेड्या | मुंबई | ABP Majha