मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक आज पार पडली. मु़ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी महावाकिस आघाडीच्या समन्वय समितीच्या नेत्यांमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत पावसाळी अधिवेशन संदर्भातील रणनिती तसेच विधानसभा अध्यक्ष पद निवडणुकीसंदर्भात महत्वाची चर्चा झाली. या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील उपस्थित होते. 


बैठकीत काय झालं? 


उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहेत. सीबीआयतर्फे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून केली आहे. विरोधकांनी अजित पवार आणि अनिल परबांच्या विरोधात दिलेल्या पत्राबाबत चर्चा झाली. अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर केंद्राकडून कारवाईसाठी दबाव आणत असल्याची चर्चा झाली.  


अजित पवारांची सीबीआय चौकशी करा, चंद्रकांत पाटील यांचं केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र


विरोधी पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने सरकारला बदनाम करण्यासाठी करत आहे. सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे, अशी टीका वारंवार सरकारकडून केली जात आहे. विविध मुद्यांवर सरकारवर विरोधक निशाणा साधत आहेत. अशा पद्धतीने सरकार विरोधक बदनाम करत असल्याचा सूर बैठकीत निघाला. 


Maharashtra Vidhan Sabha: येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेला अध्यक्ष मिळणार, काँग्रेसमध्ये लॉबिंग सुरु


विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी अनुकूल असल्याचं चित्र दिसत आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भातही आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला पत्र लिहिले आहे. विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार असे पत्र राज्यपालांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. राज्यपालांनी 24 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पत्र लिहिले आहे. 


Bhagat Singh Koshyari : विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार? राज्यपालाचं सरकारला पत्र