Marathi Bhasha Din LIVE : एबीपी माझावर मायमराठीचा जागर, पाहा प्रत्येक अपडेट्स
Marathi Bhasha Din LIVE :मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं एबीपी माझा आपल्या या मायमराठीचा वैचारिक जागर करणार आहे. आज आणि उद्या दोन दिवस मायमराठीचा हा जागर एबीपी माझावर असणार आहे.
Marathi Bhasha Din : "मराठी राजभाषा दिन" विशेष.. अभिजात मराठी...
अशोक खाडे, भरत दाभोळकर, वीणा पाटील,विश्वनाथ पेठे, मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल
त्यांचा दृष्टिकोन मांडत आहेत...
कार्यक्रमाच्या पहिल्या चर्चा सत्रामध्ये सुभाष देसाई यांनी सांगितलं, 'या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी एबीपी माझाचे आभार मानतो. मी दोन दिवसांपूर्वी दिल्लीला जाऊन आलो तेव्हा किशन रेड्डी यांना भेटलो. मी त्यांना सुरूवातीला सांगितलं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही विनंती करायला मी आलेलो नाही. मी तुमचे आभार मानतो की तुम्ही संसदेमध्ये हे स्पष्ट केलं की, मराठी भाषेची मागणी ही पूर्ण योग्य आहे. आम्ही लवकरच मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करू. त्या आश्वासनाबद्दल मी त्यांचे आभार मानले. मी त्यांना विनंती केली की 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रम मुंबईमध्ये होणार आहे तिथे तुम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतची घोषणा करावी. तेव्हा आम्हाला तुमचे आणि केंद्र सरकारचे आभार मानण्याची संधी मिळेल.'
Marathi Bhasha Din : ''माझ्या कुटुंबात इंग्रजी माध्यमात जाणारं पहिलं मूल म्हणजे मी होते. माझी सगळी भावंडं मराठी माध्यमात शिकली, मी पहिली मुलगी होते जी इंग्रजी माध्यमात शिकले. माझ्या आईचा हा आग्रह होता. जगाला तोंड देण्यासाठी, टिकण्यासाठी म्हणून इंग्रजी माध्यमात शिकली पाहिजे असं म्हणून आईने तो निर्णय घेतला. तेव्हापासून आजपर्यंत आमची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात. इतरांना बोलण्यापेक्षा आम्ही आर आर पाटलांचं उदाहरण देतो. आबांची मुलं मराठी शाळेत शिकली, असं राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या
पुढे बोलताना विनोद तावडे म्हणाले की, मराठीसाठी राजकीय व्यवस्थेतून लोकांना आत्मविश्वास द्यायला हवा. हा आत्मविश्वास आम्ही सामान्य माणसांच्या मनात बिंबवायला हवा होता. मराठी भाषेला स्थान देण्याचं काम आपल्यालाच द्यावं लागणार आहे. अभिजात दर्जा मिळाल्यानं काय होईल, निधी मिळेल. राजकीय व्यवस्थेनं मराठी भाषेची चळचळ रुजवण्यासाठी सामान्यांच्या मनात आत्मविश्वास करायला हवा होता तो आम्ही करु शकलो नाहीत, हे वास्तव आहे, अशी कबुलीही माजी मराठी भाषा मंत्री राहिलेल्या विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. अनावश्यक हट्ट धरल्यानं मराठी पुढं जाईल का? याबाबत शंका आहे असं ते म्हणाले. मराठी डिजिटलवर अधिकाधिक कशी येऊ शकेल यासाठी प्रयत्न व्हायला हवा.
Marathi Bhasha Din : मराठीसाठी राजकीय व्यवस्थेतून लोकांना आत्मविश्वास द्यायला हवा असं म्हणत माजी मराठी भाषा मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी मराठी भाषेचा आग्रह धरा, पण अनावश्यक हट्ट नको, असं म्हटलं आहे. मार्केटिंग कॉल येतात त्यांच्याशी मी मराठीत बोलतो, जर 13 कोटी मराठी लोकांनी असं केलं तर कॉलसेंटरमध्ये ज्याला मराठी येते त्यालाच नोकरी मिळेल. मराठी भाषेचा आग्रह धरा, पण अनावश्यक हट्ट नको. जिथे अर्थ समजण्यासाठी आवश्यक तसे शब्द वापरले पाहिजेत. मराठी वाचवण्यासाठी सर्व राजकीय व्यवस्थेने करावं, सर्व माध्यमांनी करायला हवं. कोण कमी पडलं याला महत्व नाही, काय कमी पडलं यावर आपण विचार करायला हवा.
मराठी. अभिजात मराठी. आपल्या मनामनात दंगणारी मराठी.आपल्या रगारगात रंगणारी आणि उराउरात स्पंदणारी मराठी. संत ज्ञानेश्वरांनी जिचा उल्लेख, 'माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके' अशा शब्दांत केला आहे. हजारो वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेली ही आपली मायमराठी भाषा अभिजात होती, आहे आणि राहील. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं एबीपी माझा आपल्या या मायमराठीचा वैचारिक जागर करणार आहे. साहित्य, कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अभिजात मराठीचं मंथन या कार्यक्रमात होणार आहे. आज आणि उद्या दोन दिवस मायमराठीचा हा जागर एबीपी माझावर असणार आहे.
पार्श्वभूमी
Marathi Bhasha Din : मराठी. अभिजात मराठी. आपल्या मनामनात दंगणारी मराठी.आपल्या रगारगात रंगणारी आणि उराउरात स्पंदणारी मराठी. संत ज्ञानेश्वरांनी जिचा उल्लेख, 'माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके' अशा शब्दांत केला आहे. हजारो वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेली ही आपली मायमराठी भाषा अभिजात होती, आहे आणि राहील. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं एबीपी माझा आपल्या या मायमराठीचा वैचारिक जागर करणार आहे. साहित्य, कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अभिजात मराठीचं मंथन या कार्यक्रमात होणार आहे. आज आणि उद्या दोन दिवस मायमराठीचा हा जागर एबीपी माझावर असणार आहे.
मराठीसाठी राजकीय व्यवस्थेतून लोकांना आत्मविश्वास द्यायला हवा- विनोद तावडे
मराठीसाठी राजकीय व्यवस्थेतून लोकांना आत्मविश्वास द्यायला हवा असं म्हणत माजी मराठी भाषा मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी मराठी भाषेचा आग्रह धरा, पण अनावश्यक हट्ट नको, असं म्हटलं आहे. मार्केटिंग कॉल येतात त्यांच्याशी मी मराठीत बोलतो, जर 13 कोटी मराठी लोकांनी असं केलं तर कॉलसेंटरमध्ये ज्याला मराठी येते त्यालाच नोकरी मिळेल. मराठी भाषेचा आग्रह धरा, पण अनावश्यक हट्ट नको. जिथे अर्थ समजण्यासाठी आवश्यक तसे शब्द वापरले पाहिजेत. मराठी वाचवण्यासाठी सर्व राजकीय व्यवस्थेने करावं, सर्व माध्यमांनी करायला हवं. कोण कमी पडलं याला महत्व नाही, काय कमी पडलं यावर आपण विचार करायला हवा.
पहिल्या चर्चासत्रात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai), खासदार सुप्रिया सुळे (supriya Sule), भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawade) उपस्थित होते. या सत्राचं संचालन एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी केलं.
मराठीसाठी राजकीय व्यवस्थेतून लोकांना आत्मविश्वास द्यायला हवा
पुढे बोलताना विनोद तावडे म्हणाले की, मराठीसाठी राजकीय व्यवस्थेतून लोकांना आत्मविश्वास द्यायला हवा. हा आत्मविश्वास आम्ही सामान्य माणसांच्या मनात बिंबवायला हवा होता. मराठी भाषेला स्थान देण्याचं काम आपल्यालाच द्यावं लागणार आहे. अभिजात दर्जा मिळाल्यानं काय होईल, निधी मिळेल. राजकीय व्यवस्थेनं मराठी भाषेची चळचळ रुजवण्यासाठी सामान्यांच्या मनात आत्मविश्वास करायला हवा होता तो आम्ही करु शकलो नाहीत, हे वास्तव आहे, अशी कबुलीही माजी मराठी भाषा मंत्री राहिलेल्या विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. अनावश्यक हट्ट धरल्यानं मराठी पुढं जाईल का? याबाबत शंका आहे असं ते म्हणाले. मराठी डिजिटलवर अधिकाधिक कशी येऊ शकेल यासाठी प्रयत्न व्हायला हवा.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -