Marathi Language Day : येत्या 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा करण्यात येत आहे. या निमित्तानं राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मराठी भाषा दिनानिमित्त एबीपी माझाकडून दरवर्षी उपक्रम चालवले जातात. यंदा मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi Bhasha Din) एका अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठी भाषेत पत्रलेखनाची ही स्पर्धा असून भाषेसह पत्रलेखनाला चालना मिळावी हा यामागचा उद्देश आहे. 


तर यानिमित्तानं एबीपी माझा (ABP Majha) गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही एक पत्र लिहूया आणि आपल्या मायबोली विषयी कृतज्ञता व्यक्त करुया. 'एक पत्र आपल्या जिवलगांसाठी, एक पत्र आपल्या मराठी भाषेसाठी' या अंतर्गत पत्रलेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 


पत्रलेखनाचा विषय
माझी आवडती व्यक्ती
मला प्रेरणा देणारी व्यक्ती


स्पर्धेचे नियम आणि अटी
१- पत्र स्वहस्ताक्षरात आणि कागदावर लिहिलेलं असावं हा आग्रह.


२- पत्राची शब्द मर्यादा 200 पर्यंतच असावी 
( शब्दमर्यादा ओलांडणारी पत्रं ग्राह्य धरली जाणार नाहीत)


३- आपलं पत्र हा संवाद असावा निबंध नसावा ही मनापासून विनंती


४- 25 फेब्रुवारीपर्यंत आपल्या सर्वांची पत्रं एबीपी माझाच्या मुंबई ऑफिसपर्यंत पोहोचतील याची काळजी घ्यावी. 


५- पोस्टानं पत्र येण्यास विलंब होणार असल्यास आपण ईमेल आयडीवरही आपलं पत्रं मेल करु शकता. 
(हे पत्र PDF FORMAT मध्ये स्कॅन करुनच पाठवावं. पत्राचा फोटो स्विकारला जाणार नाही.)


६- प्रथम प्राधान्य लिखीत स्वरुपातल्या एबीपी माझाच्या पत्त्यावर पाठवलेल्या पत्रांना दिलं जाईल


७-या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही.


८- स्पर्धेतल्या पत्रातून काही विशेष उल्लेखनीय पत्रं एबीपी माझाच्या वेबसाईटवर प्रकाशित केली जातील ( उल्लेखनीय पत्रं निवडीचा अधिकार सर्वस्वी एबीपी माझाचा असेल)


आपलं पत्र पाठवण्यासाठीचा पत्ता


एबीपी माझा
एबीपी न्यूज सेंटर,
३०१, बोस्टन हाऊस,
सुरेन रोड, चकाला, 
अंधेरी पूर्व,
मुंबई- ४०००९३


आपण आपली पत्रं आम्हाला marathiletters@gmail.com या ईमेल आयडीवर देखील पाठवू शकता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maratha Reservation : संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा; मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण


Amol Kolhe : अमोल कोल्हेंनी दिलेला शब्द पाळला, अखेर शर्यतीत घोडीवर झाले 'स्वार'



  • LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha