Sambhaji Chhatrapati :  2007 पासून मी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाज देखील वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली. मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे असं नाही. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झालं. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली. परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो परंतू आता मी उद्विग्न झालो असल्याचे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले. मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले. 


मला समन्वयक यांनी सांगितल की टोकाची भूमिका घेऊ नका. परंतू सरकार काहीच हालचाल करतं नाही. त्यामुळे माझी भूमिका आहे की आता 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी सर्वांना घेऊन जाणारा माणूस आहे मी शाहू महाराजांचा वारस आहे. मला सगळ्यांना एवढचं सांगायचे आहे की आम्हाला टिकणारे आरक्षण द्या. मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हात जोडून विनंती केली की आरक्षण द्या.  आरक्षण कशामुळे गेलं हे देखील सांगितले परंतू काहीच हालचाल झाली नाही. मी आरक्षण रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन दखल करा असं सांगितल. परंतू खुप दिवसांनंतर याचीका दाखल केली. सध्या त्याची काय परिस्थिती आहे हे काहीच माहिती नाही. माझं स्पष्ट मत आहे की समिती स्थापन करा. परंतू अजून काहीच केलं नसल्याचे संभाजीराजे म्हणाले.


सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे की 50 टक्क्यांच्यावर आरक्षण द्यायचं असेल तर अपवादात्मक परिस्थीत असायला हवी. अनेकजण म्हणातात की ओबीसीमधून आरक्षण द्यायला हवं, परंतु माझं म्हणणं आहे की टिकणारं आरक्षण द्या. मी सर्व नेत्यांच्या दारी गेलो. मूक आंदोलन कोल्हापुरात केलं परंतू, यांनी काहीच केलं नाही. मोजून पाच ते सहा मागण्या आहेत परंतू अजूनही मान्य होत नाहीत. मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अनेक दिग्गजांच्या भेटी घेतल्या आहेत. राज्यभरातील अनेकांसोबत मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर त्यांनी चर्चा केली आहे. मराठा आरक्षणासाठी पुढील वाटचाल कशी असणार आहे याबाबतची दिशाही ते आज ठरवणार आहेत.