औरंगाबाद : जालना (Jalna) येथील घटनेचे पडसाद आता राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात देखील दुसऱ्या दिवशी या घटनेचे पडसाद पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. तर कुठे आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर काही ठिकाणी टायर पेटवून जालना येथील घटनेचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीवर पोलिसांचे लक्ष असल्याचे दिसून येत असून, तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आले आहे. 


पैठण बंदची हाक...


जालना येथील आंदोलकांना पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज पैठण तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून तालुक्यात सर्वच बाजारपेठ आणि गाव बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. तर पाचोड आठवडी बाजारपेठ देखील बंद ठेवण्यात आला आहे. तर पैठण शहरातील मुख्य बाजारपेठ सुद्धा बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. तर या पार्श्वभूमीवर पैठण, बिडकीन, पैठण एमआयडीसी आणि पाचोड पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. 


जिल्ह्यातील आजची परिस्थिती...



  • जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेचे पडसाद औरंगाबाद जिल्ह्यात देखील उमटताना पाहायला मिळत आहे.

  • दरम्यान आज देखील औरंगाबाद जिल्ह्यात सकाळपासून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

  • आज औरंगाबाद जिल्ह्यात कोठे बाजारपेठ तर कुठे गाव बंदची हाक देण्यात आली आहे.

  • पैठण तालुक्यातील मोठा बाजार असलेला पाचोड आठवडी बाजार आज बंद ठेवण्यात आला आहे.

  • पाचोडमध्ये आज सकाळपासून शुकशुकाट पाहायला मिळत असून, दुकाने बंद असल्याचे दिसून येत आहे.

  • पाचोड आठवडी बाजारात देखील आज एकही दुकान लागलेली नाही. त्यामुळे बाजार तळ परिसरात शुकशुकाट आहे.

  • तर पैठण शहरात देखील आज सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली असून, पैठण तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.

  • कन्नड तालुक्यातील पिशोरमध्ये मराठा आरक्षणच्या मागणीसाठी आणि जालना येथील घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजातर्फे रस्ता रोको करण्यात आला आहे.

  • कन्नड तालुक्यातील अनेक भागात अशीच परिस्थिती असून, अनेक गावात आज बंदची हाक देण्यात आली आहे.

  • सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात देखील आज सकाळपासून बंद पाहायला मिळत आहे.

  • पैठण तालुक्यातील नांदर येथे मराठा समाजाच्या वतीने टायर पेटवून गाव बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच यावेळी जालना येथील घटनेचा निषेध करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Maratha Reservation : जालन्यातील घटनेनंतर मराठा समाज आक्रमक; उद्या औरंगाबाद बंदची हाक