मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Resrvation)  मागणीसाठी राज्यभर आंदोलनं केली जाता आहेच . याच आंदोलनाची धग आता एसटी महामंडळालाही (ST Mahamandal) बसू लागलीये. काही ठिकाणी एसटीवर दगडफेक करण्यात आली तर काही ठिकाणी थेट एसटीच पेटवण्यात आली. एसटीचं हेच नुकसान थांबवण्यासाठी महामंडळाने एसटीच्या सेवेला ब्रेक लावलाय. 


 राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या या आंदोलनाची झळ एसटी बसेसला बसत आहे. रोज हजारो प्रवासी एसटीने प्रवास करत असतात. त्यात दिवाळी तोंडावर आहे. त्यामुळे  प्रवाशांची लगबग वाढली आहे. मात्र बस बंद असल्याने प्रवाशांना हाल सहन करावे लागत आहे.  एसटी बसेसची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत यामुळे लालपरीची सेवा ठप्प झाली आहे.


कुठल्या मार्गावर लालपरीला ब्रेक?


 बीड : शहरात 72 एसटी फोडल्याने संपूर्ण जिल्ह्यात एसटी सेवा संपूर्णपणे बंद


मराठवाडा:  बीड, संभाजीनगर, सोलापूर, परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक पूर्णतः बंद आहे.


बुलढाणा:  जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या 70 बस फेऱ्या रद्द


अहमदनगर: जिल्ह्यात कर्जत, श्रीगोंदा,जामखेड, पारनेर या तालुक्यांत एसटी सेवा पूर्णपणे बंद तर इतर ठिकाणी अंशतः बंद.


 पंढरपूर: एसटी बस सेवा बंद आहे


हिंगोली: बस सेवा बंद आहे


धुळे : आगरातून मराठवाड्याकडे आणि अहमदनगर कडे जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात  आल्या आहेत. तर पुण्याकडे जाणाऱ्या बसेस संगमनेर मार्गे वळवण्यात आल्या आहेत. बाकी इतर बसेस सुरळीत सुरू आहेत


अकोला : मराठवाड्याकडे जाणाऱ्या 47 फेऱ्या रद्द करण्यात आलेया आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नांदेड, बीड, पंढरपूर, हैदराबाद,  अंबड याकडे जाणाऱ्या बस फेऱ्यांचा समावेश आहे. अकोला विभागात अकोला आणि वाशिम या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. 


नंदुरबार :  नंदुरबार जिल्ह्यातील बस सेवा सुरळीत चालू आहे तर नंदुरबारमधून मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत


सांगली : सांगली - मिरज बसस्थानकातून कर्नाटक आणि सोलापूरकडे जाणाऱ्या सर्व बसेस बंद रद्द करण्यात आल्या आहेत. 


चिपळूण : चिपळूणमधून घाटमाथ्यावर 10 एसटीच्या फेऱ्या रद्द पुणे, बीड,अक्कलकोट,मिरज,कोल्हापूर,बेळगाव मार्गावरील एसटी च्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 


हे ही वाचा :