मुंबई : मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नी मागील काही दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी महाराष्ट्र दौरा केला आहे. त्यानंतर आता त्यांनी मुंबईत आल्या नंतर विविध पक्षांचे प्रमुख आणि वरिष्ठ नेते यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. आत्तापर्यंत संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली आहे. उद्या ते पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. सध्या संभाजीराजे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी मागील अर्ध्या तासापासून बैठक सुरू आहे. संभाजी राजे छत्रपती यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. आज दिवसभरात त्यांनी अनेक नेत्यांशी भेट घेऊन चर्चा केलीय. आता ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असून या भेटीनंतर ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे. 


Martha Reservation Update : 'माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देतो' : खासदार संभाजीराजे छत्रपती 


शरद पवारांसोबतच्या बैठकीत काय झालं?
मराठा आरक्षण प्रश्नी संभाजीराजेंनी काल (27 मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे 13 मिनिटांच्या या भेटीत मराठा समाजाची अस्वस्थता शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवल्याचा दावा संभाजीराजेंनी केला. सोबतच आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचं आवाहन पवारांना केल्याचं त्यांनी सांगितलं.


Chandrakant Patil : भाजपनं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीत : चंद्रकांत पाटील


गरीब, गरजू मराठा समाजाला न्याय मिळावा ही राज ठाकरेंची भूमिका
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजेंनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही भेट घेतली. भेटीनंतर संभाजीराजे म्हणाले की, "राज ठाकरे जात पात मानत नाहीत. त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. पण गरीब आणि गरजू मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे." तसंच राज ठाकरे यांचे आजोबा आणि माझे आजोबा यांचे असणारे संबंध, शिवाय गडकिल्ल्यांचं संवर्धन यावरही चर्चा केल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. 


Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवारांच्या भेटीनंतर संभाजीराजे म्हणाले...


माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देतो 


माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी उद्याच राजीनामा देतो, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोलापूर दौऱ्यात दिली होती. ते म्हणाले होते की,  28 मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्यासोबत एकत्रित बैठक करणार आहोत. हा दौरा कोणत्याही सरकारविरोधात किंवा पक्षाविरोधात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, ओबीसी समाजाचे ज्येष्ठ लोक भेटले त्यांनी मला चांगला मार्ग सांगितला. मराठा समाजाची दिशाभूल होऊ नये यासाठी दौरा करतोय.  लोकांना काय वाटतेय यापेक्षा कायदा काय आहे हे पाहणे गरजेचे आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठीच मी हा दौरा सुरु केलाय, असं त्यांनी म्हटलं होतं. 


राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून मराठा समाजासाठी एकत्र यावं : खासदार संभाजीराजे


महाराष्ट्र दौऱ्यानंतर संभाजीराजेंच्या गाठीभेटी 
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. रस्त्यावर येऊन मोर्चा, आंदोलन करण्याचा इशारा काही मराठा संघटनांनी दिला आहे. परंतु सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता आंदोलन, मोर्चे टाळण्याचं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे. त्यामुळेच संभाजीराजे राज्यभर दौरा करुन मराठा समाजाची म्हणणं, त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर ते विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं असं आवाहन करत आहेत.