Manoj jarange patil : सरकारकडून मराठ्यांवर 100 टक्के अन्याय होणार आहे, हे आम्हाला दिसत आहे. त्यामुळं आता आम्ही ताकतीने उठाव करणार असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी केलं. मंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांच्या शब्दाखातर 13 जुलैपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत असे मनोज जरांगे म्हणाले. 13 जुलैपर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भातील प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारला वेळ देण्यात आला आहे. त्यामुळं 13 जुलैपर्यंत सरकार काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल. 


प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान करत होतो आणि करत राहणार


दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीने सगे सोयरेचा अध्यादेश रद्द करावा तथा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या स्वरूपाचे बॅनर लावले आहे. याबाबत मनोज जरांगे यांना वंचित बहुजन आघाडीने अशी का भूमिका घेतली? हे विचारण्यात आले. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, आपल्याला याबाबत माहिती नाही. मात्र, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा आपल्याला स्पष्टपणा आवडतो. त्यामुळं आपण अगोदरही सन्मान करत होतो आणि उद्याही करत राहू असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. 



 




13 जुलैनंतर सरकारचं काहीही ऐकून घेणार नाही


 

मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप कायम असून उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जरांगे यांनी राज्य सरकारला 13 जुलैपर्यंतचा अवधी दिला असून त्यानंतर आपण सरकारचं काहीही ऐकून घेणार नाही, असे त्यांनी म्हटले. तुम्ही पलट्या मारल्या तर तुमचं सरकार म्या पलटी केलंच समजायचं, अशा शब्दात जरांगे यांनी सरकारला इशाराही दिला आहे. उपोषणानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीत आले आहेत. मी अंतरवलीत येण्यासाठी आसूसलेलो होतो, मरणाच्या शेवटच्या घटकासोबत मी समाजासोबतच राहणार असल्याचे जरांगे म्हणाले.  


सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा, जरांगे पाटलांची मागणी


मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळं सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र देणं गरजेचं असल्याचे जरांगे म्हणाले. तसेच सगेसोयरेच्या अंमलबजावणी व्याख्या आमच्या म्हणण्याप्रमाणं  करा, अन्यथा विधानसभेला गुलाल तुमच्यावर रुसेल असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. तुम्ही वाशीत लावलेल्या गुलालाचा अपमान करु नका. कोणाच्याही दबाबावाला बळी पडू नका असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. 





महत्वाच्या बातम्या:


''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन